अक्षय कुमारकडून आसामच्या पूरग्रस्तांना 2 कोटींची आर्थिक मदत

| Updated on: Jul 17, 2019 | 11:15 PM

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार नेहमीच आपल्या देशभक्ती आणि सामाजिक कार्यामुळे चर्चेत असतो. यंदाही अक्षय कुमारने आसाम, बिहार आणि उत्तर प्रदेशमधील पुरग्रस्तांना दोन कोटींची मदत केली आहे.

अक्षय कुमारकडून आसामच्या पूरग्रस्तांना 2 कोटींची आर्थिक मदत
Follow us on

दिसपूर (आसाम) : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार नेहमीच आपल्या देशभक्ती आणि सामाजिक कार्यामुळे चर्चेत असतो. यंदाही अक्षय कुमारने आसाम, बिहार आणि उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्तांना दोन कोटींची मदत केली आहे. अक्षयने चीफ मिनिस्टर रिलीफ फंड आणि काजीरंग नॅशनल पार्टसाठी प्रत्येकी 1 कोटी रुपये दान केले आहे. अक्षयने स्वत: ट्वीट करत याची माहिती दिली.

पुरामध्ये अनेकजण अडकले आहेत, तर काहींचे मोठे नुकसान झाले आहे. प्राण्यांनाही याचा फटका बसला आहे. त्यांच्या मदतीसाठी अनेकांनी पुढे येत मदत केली आहे. यावर अक्षयनेही आर्थिक मदत करत इतरांनाही दान करण्याचे आवाहन केले आहे.

यापूर्वीही अक्षयने अनेकांना मदत केली आहे. उडीसामध्ये काही दिवसांपूर्वी आलेल्या वादळात अनेकजणांचे नुकसान झाले होते. यासाठीही अक्षयने 1 कोटी रुपयांची मदत केली होती. याशिवाय भारतातील शहीद जवानांच्या कुटुंबांना अक्षय मदत करत असतो. तसेच केरळ आणि चेन्नईमधील पुरग्रस्तांनाही अक्षयने मदत केली होती.

अभिनेत्री प्रियांका चोप्रानेही आसाम पुरग्रस्तांच्या मदतीसाठी आवाहन केले आहे. आसाममधील पुरग्रस्तांसाठी मी प्रार्थना करते, असं प्रियांकाने ट्वीट करत म्हटले.

आसाममधील पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. अनेक घर उद्धवस्त झाली असून अनेकजणांचा यामध्ये मृत्यू झाल्याचे बोललं जात आहे. त्यासोबतच प्राण्यांनाही याचा मोठा फटका बसला आहे. सरकारकडून पुरग्रस्तांसाठी बचावकार्य सुरु असून अनेक दिग्गज लोक पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढे आले आहेत.