वायूसेनेच्या कारवाईनंतर अक्षय कुमार म्हणतो, आत घुसून मारा…

मुंबई : भारतीय वायूसेनेने पुलवामामध्ये शहीद झालेल्या 40 जवानांच्या मृत्यूचा बदला घेतला आहे. आज पहाटे 3.30 वाजता भारतीय वायुसेनेने मिराजच्या माध्यमातून पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये जाऊन जैश-ए-मोहम्मदच्या जागी एअर स्ट्राईक केली. अंदाजे 200 ते 300 दहशतवाद्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीय वायूसेनेच्या बहादुरी बद्दल संपूर्ण देश सलाम करत आहे. बॉलिवूडचे दिग्गज कलाकारही वायूसेनेच्या जवानांना सोशल मीडियावर सलाम […]

वायूसेनेच्या कारवाईनंतर अक्षय कुमार म्हणतो, आत घुसून मारा...
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM

मुंबई : भारतीय वायूसेनेने पुलवामामध्ये शहीद झालेल्या 40 जवानांच्या मृत्यूचा बदला घेतला आहे. आज पहाटे 3.30 वाजता भारतीय वायुसेनेने मिराजच्या माध्यमातून पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये जाऊन जैश-ए-मोहम्मदच्या जागी एअर स्ट्राईक केली. अंदाजे 200 ते 300 दहशतवाद्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीय वायूसेनेच्या बहादुरी बद्दल संपूर्ण देश सलाम करत आहे. बॉलिवूडचे दिग्गज कलाकारही वायूसेनेच्या जवानांना सोशल मीडियावर सलाम करत आहेत.

अक्षय कुमारनेही जोश निर्माण होईल असं ट्वीट केलं आहे. त्याने म्हटलं की, “भारतीय वायूसेनेवर मला गर्व आहे, आपले फायटर दहशतवाद्यांचा खात्मा करत आहेत. आत घुसून मारा.”

अभिनेत्री सेलिना जेटलीने म्हटलं आहे की, “याद रहे, नाम, नमक और न‍िशान. इंड‍ियन एयरफोर्स को सैल्यूट, मोदी जी जय ह‍िंद.” यासह अनेक बॉलिवूड कलाकारांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

बॉलिवूडमध्ये पाकव्याप्त कारवाईमध्ये हल्ला केल्यानंतर मोदी सरकारचे मोठ्या प्रमाणात सर्वांतर्फे कौतुक करण्यात येत आहे. बॉलिवूडसह टीव्ही इंडस्ट्रीच्या कलाकारांनी सुद्धा सोशल मीडियावर ट्वीट करत भारतीय जवानांच्या कामगिरीला सलाम करत आहेत. तसेच गायक कैलास खेर यांनी सुद्धा नवी दिशा नवी दशा, नवी रीति नवी नीति, नवीन भारताला सच्च्या भारताच्या सुपूत्रांना शत शत नमन, असं म्हटलं आहे.