गुणवत्ताहीन किट्स पुरवणाऱ्या कंपनीवर कारवाई होणार, आरोग्यमंत्र्यांचा गैरसमजही दूर करणार- देशमुख

जालना: कोरोना चाचणीसाठी वापरल्या जाणाऱ्या RTPCR टेस्ट किट्स या केंद्र सरकारच्या ICMR या संस्थेनं निर्धारित केलेल्या पुरवठादारांकडून राज्याला मिळाल्या आहेत. या किट्स वैद्यकीय शिक्षण विभागानं खरेदी केलेल्या नाहीत. त्यामुळं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना गैरसमज झाला आहे. त्यांच्याशी चर्चा करुन तो दूर करणार असल्याचं वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी म्हटलंय. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव सुरुच असताना दुसरीकडे […]

गुणवत्ताहीन किट्स पुरवणाऱ्या कंपनीवर कारवाई होणार, आरोग्यमंत्र्यांचा गैरसमजही दूर करणार- देशमुख
Follow us
| Updated on: Oct 14, 2020 | 1:50 PM

जालना: कोरोना चाचणीसाठी वापरल्या जाणाऱ्या RTPCR टेस्ट किट्स या केंद्र सरकारच्या ICMR या संस्थेनं निर्धारित केलेल्या पुरवठादारांकडून राज्याला मिळाल्या आहेत. या किट्स वैद्यकीय शिक्षण विभागानं खरेदी केलेल्या नाहीत. त्यामुळं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना गैरसमज झाला आहे. त्यांच्याशी चर्चा करुन तो दूर करणार असल्याचं वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी म्हटलंय. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव सुरुच असताना दुसरीकडे कोरोना चाचणीसाठी वापरल्या जाणाऱ्या RTPCR च्या तब्बल १२ लाख ५० हजार किट्स सदोष असल्याची कबुली आरोग्यमंत्र्यांनी दिली होती. (Amit Deshmukh on RTPCR Kits and Rajesh Tope allegation)

‘राज्य सरकारनं खरेदी केलेल्या GCC कंपनीच्या टेस्ट किट्स सदोष असल्याचा अहवाल एनआयव्हीने दिला. वैदयकीय शिक्षण मंत्रालयाकडून या किट्सची खरेदी करण्यात आली होती. GCC कंपन्यांच्या किट्सचा वापत तात्काळ थांबवण्यात आला आहे. सदोष किट्स पुरवणाऱ्या कंपनीवर कारवाई करणार’ असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले होते. त्यावर बोलताना अमित देशमुख यांनी टोपे यांचा काही तरी गैरसमज झाला असल्याचं म्हटलं.

दरम्यान, RTPCR किट्स या केंद्र सरकारच्या ICMR संस्थेनं नियुक्त केलेल्या पुरवठादाराकडून मिळाल्या आहेत. त्यामुळं खरेदीबाबत टोपे यांचा झालेला गैरसमज दूर करणार असल्याचं देशमुख म्हणाले.

…तर पुरवठादार कंपनीवर कारवाई – देशमुख

ICMRद्वारे नेमण्यात आलेल्या पुरवठादाराकडून पुरवण्यात आलेल्या किट्सची गुणवत्ता तपासण्यात येत आहे. त्यात काही दोष आढळल्यास त्याची कारणमिमांसा होईल. त्यानंतर कंपनीवर कारवाई करण्याबाबत सरकार निर्णय घेईल, अशा इशाराही वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिला आहे.

वर्षअखेरिस किंवा 2021 च्या सुरुवातीला लस!

जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO कोरोना लस उपलब्ध होण्याबाबत मोठी माहिती दिली आहे. जगभरात कोरोनाच्या 10 लसीच्या चाचण्या अंतिम टप्प्यात आहेत. यापैकी एखादी लस 2020 च्या अखेरपर्यंत किंवा 2021 च्या सुरुवातीला उपलब्ध होईल, अशी शक्यता WHO ने व्यक्त केली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही कोरोना लसीबाबत एक दिलासादायक माहिती दिली आहे. भारत बायोटेकच्या कोरोना लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी लवकरच सुरु होणार आहे. तसंच ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या लसीची चाचणीही तिसऱ्या टप्प्यात आहे. या दोन्ही लसीची परिणामकारकता नोव्हेंबर ते डिसेंबरदरम्यान समोर येईल असंही आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलंय.

संबंधित बातम्या:

जगभरातील 10 कोरोना लस वैद्यकीय चाचणीच्या अंतिम टप्प्यात, वर्षअखेर लस येण्याचा WHO चा अंदाज

अनिल परब यांना कोरोनाची लागण, मुख्यमंत्र्यांकडून आमदारांची बैठक रद्द

Amit Deshmukh on RTPCR Kits and Rajesh Tope allegation

Non Stop LIVE Update
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.
जाहीरपणे धमक्या? ही भाषा तुम्हाला शोभते का? राऊतांचा दादांवर घणाघात
जाहीरपणे धमक्या? ही भाषा तुम्हाला शोभते का? राऊतांचा दादांवर घणाघात.
48 तासात उत्तर द्या, अन्यथा... निवडणूक अधिकाऱ्याकडून पुन्हा नोटीस
48 तासात उत्तर द्या, अन्यथा... निवडणूक अधिकाऱ्याकडून पुन्हा नोटीस.
भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड सापडली, भरारी पथकाची कारवाई
भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड सापडली, भरारी पथकाची कारवाई.
मला शरम वाटली असती, असे म्हणत अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची मिमिक्री
मला शरम वाटली असती, असे म्हणत अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची मिमिक्री.
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट.
गडी आपल्यात आला पाहिजे, नाहीतर घाबरून...,सदाभाऊंचं ईडीसंदर्भातील विधान
गडी आपल्यात आला पाहिजे, नाहीतर घाबरून...,सदाभाऊंचं ईडीसंदर्भातील विधान.
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....