‘सोढी’च्या शेवटच्या लोकेशनबद्दल मोठा खुलासा, एटीएममधून काढले इतके पैसे आणि त्यानंतर गुरुचरण सिंग गायब, वाढले गूढ

तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेत सोढीची भूमिका साकारणारा अभिनेता गुरुचरण सिंग हा बेपत्ता झाला. गुरुचरण सिंग याच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण हे बघायला मिळत आहेत. गुरुचरण सिंग याच्या प्रकरणात मोठे अपडेट पुढे येताना दिसत आहेत. अजूनही या प्रकरणात मोठे खुलासे होऊ शकतात.

'सोढी'च्या शेवटच्या लोकेशनबद्दल मोठा खुलासा, एटीएममधून काढले इतके पैसे आणि त्यानंतर गुरुचरण सिंग गायब, वाढले गूढ
Gurucharan Singh
Follow us
| Updated on: Apr 28, 2024 | 1:02 PM

तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेत रोशन सिंग सोढीची भूमिका साकारणारा अभिनेता गुरूचरण सिंग हा गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता आहे. आता पोलिसांनी या प्रकरणात तपास देखील सुरू केला आहे. हैराण करणारे म्हणजे 22 एप्रिलपासून गुरूचरण सिंग हा बेपत्ता आहे. 22 एप्रिलला दिल्लीवरून गुरूचरण सिंगचे मुंबईसाठीचे सकाळी आठचे फ्लाईट होते. मात्र, हैराण करणारे म्हणजे गुरूचरण सिंग हा विमानतळावर पोहचलाच नाही. तो 24 एप्रिलपर्यंत दिल्लीच होता. आता या प्रकरणात तपास करत असलेल्या पोलिसांच्या हाती काही महत्वाची माहिती ही लागली आहे. जाण्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसलाय.

गुरूचरण सिंग हा दिल्लीच्या पालम परिसरातील काही सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसला आहे. यावेळी रस्त्याच्याकडेने तो एकटाच चालताना दिसतोय. हेच नाही तर यावेळी त्याच्या पाठीवर एक बॅग देखील दिसत आहे. हैराण करणारे म्हणजे गुरूचरण सिंगचे शेवटचे लोकेशन हे त्याच्या घराच्या अवघ्या दोन ते तीन किलो मीटरवर दिसत आहे, त्यानंतर तो बेपत्ता झाला.

गुरूचरण सिंगने दिल्लीच्या एका एटीएमवरून सात हजार रूपये काढल्याचे देखील पोलिस तपासात उघड झालंय. पोलिसांच्या हाती लागलेल्या कागदपत्रांनुसार गुरूचरण सिंग हा गेल्या काही दिवसांपासून आर्थिक संकटात होता. हेच नाही त्याचे लग्न देखील काही दिवसांवर होते आणि दुसरीकडे तो रूग्णालयात उपचार घेऊन घरी आराम करत होता.

हे तर स्पष्ट आहे की, गुरूचरण सिंग हा मुंबईकडे न जाता दिल्लीमध्येच होता. दिल्लीच्या पालम परिसरातील अनेक सीसीटीव्हीमध्ये तो दिसत आहे. गुरूचरण सिंगचे अपहरण केल्याचा अंदाज लावला जातोय. अजूनही पोलिस या प्रकरणात तपास करताना दिसत आहेत. गुरूचरण सिंग याने 2020 मध्ये तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका सोडली होती.

गुरूचरण सिंगची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. गुरूचरण सिंग सोशल मीडियावर सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना कायमच दिसतो. आजही लोक गुरूचरण सिंगला सोढी याच नावाने ओळखतात. गुरूचरण सिंगसाठी त्याचे चाहते हे प्रार्थना करताना दिसत आहेत. गुरूचरण सिंगच्या प्रत्येक अपडेटकडे चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत.

Non Stop LIVE Update
तर मी राजीनामा देऊन...., बीडमधील सभेत उदयनराजे भोसले भावूक
तर मी राजीनामा देऊन...., बीडमधील सभेत उदयनराजे भोसले भावूक.
...तर उद्धव ठाकरे लवकरच तुरुंगात दिसतील, अरविंद केजरीवाल यांचा दावा
...तर उद्धव ठाकरे लवकरच तुरुंगात दिसतील, अरविंद केजरीवाल यांचा दावा.
सरकार काय त्यांच्या..., अजित पवार यांचं बीडमधील भाषण चर्चेत
सरकार काय त्यांच्या..., अजित पवार यांचं बीडमधील भाषण चर्चेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती आणि ठाकरे गट आमने-सामने
छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती आणि ठाकरे गट आमने-सामने.
स्पेशल रिपोर्ट : अजितदादा आणि त्यांच्या नेत्यांची 'दादा'गिरी वादात
स्पेशल रिपोर्ट : अजितदादा आणि त्यांच्या नेत्यांची 'दादा'गिरी वादात.
केजरीवालांची अटक राजकीय, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
केजरीवालांची अटक राजकीय, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.