अमिताभ बच्चन यांची तब्येत बिघडली, जलसावरील ‘संडे दर्शन’ रद्द

मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचे चाहते भारतातच नाही, तर जगभरात आहेत. त्यांचा अभिनय आणि विनम्र स्वभावामुळे अनेकजण त्यांच्याकडे आकर्षित होतात. अमिताभ बच्चन यांच्यासाठी चाहते इतके वेडे आहेत की, त्यांची एक झलक पाहण्यासाठी त्यांच्या घरासमोर गर्दी करतात. अमिताभ देखील चाहत्यांना निराश न करता दर रविवारी जलसा बंगल्यातून बाहेर भेटायला येतात. पण या रविवारी असं […]

अमिताभ बच्चन यांची तब्येत बिघडली, जलसावरील ‘संडे दर्शन’ रद्द
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM

मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचे चाहते भारतातच नाही, तर जगभरात आहेत. त्यांचा अभिनय आणि विनम्र स्वभावामुळे अनेकजण त्यांच्याकडे आकर्षित होतात. अमिताभ बच्चन यांच्यासाठी चाहते इतके वेडे आहेत की, त्यांची एक झलक पाहण्यासाठी त्यांच्या घरासमोर गर्दी करतात. अमिताभ देखील चाहत्यांना निराश न करता दर रविवारी जलसा बंगल्यातून बाहेर भेटायला येतात. पण या रविवारी असं झालं नाही. अमिताभ बच्चन यांची प्रकृती ठीक नसल्याने रविवारी (5 मे) ते चाहत्यांना भेटू शकले नाहीत. त्यांनी ट्वीट करत त्यांची तब्येत बिघडली असल्याची माहिती दिली.

अमिताभ बच्चन सध्या 76 वर्षांचे आहेत. ते गेल्या 36 वर्षांपासून दर रविवारी त्यांच्या जुहू येथील बंगली जलसा येथे चाहत्यांना भेटतात. त्यांच्या या भेटीला ‘संडे दर्शन’ असं नाव देण्यात आलं आहे. या ‘संडे दर्शन’ला मोठ्या प्रमाणात अमिताभ यांचे चाहते त्यांना पाहण्यासाठी, भेटण्यासाठी गर्दी करतात. मात्र या रविवारी 5 मे रोजी त्यांची प्रकृती ठीक नसल्याने ते चाहत्यांना भेटले नाहीत. याबाबतची माहिती त्यांनी त्यांच्या ब्लॉगवर दिली. “आज ‘संडे दर्शन’ नाही करु शकणार. तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की, माझी प्रकृती ठीक नसल्याने आजचा हा कार्यक्रम रद्द करतो आहे. तसं काळजीचं कारण नाही. फक्त बाहेर पडू शकत नाहीये”, असं अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिलं.

अमिताभ बच्चन सध्या ‘ब्रम्हास्त्र’ आणि ‘तेरा यार हूं मैं’ या सिनेमांच्या शूटींगमध्ये व्यस्त आहेत. या वयातही ते ज्या स्फूर्तीने आणि जोषात काम करतात, ते तरुणांना लाजवणारं आहे. ते त्यांच्या प्रकृतीची खूप काळजी घेतात, तसेच नेहमी अॅक्टीव्ह असतात. त्याशिवाय ते सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतात. ते रोज वेगवेगळ्या विषयांवर ट्वीट करत असतात.