औरंगाबादेत 24 तासात 43 कोरोना रुग्णांची वाढ, आकडा शंभरीच्या उंबरठ्यावर

| Updated on: Apr 28, 2020 | 11:20 AM

औरंगाबादेत आज (28 एप्रिल) 13 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे औरंगाबादेतील कोरोना रुग्णांचा आकडा 95 वर (Aurangabad Corona Positive Patient) पोहोचला आहे.

औरंगाबादेत 24 तासात 43 कोरोना रुग्णांची वाढ, आकडा शंभरीच्या उंबरठ्यावर
Follow us on

औरंगाबाद : राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला (Aurangabad Corona Positive Patient) आहे. औरंगाबादमध्येही कोरोनाचा कहर वाढलेला दिसत आहे. औरंगाबादेत आज (28 एप्रिल) 13 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे औरंगाबादेतील कोरोना रुग्णांचा आकडा 95 वर पोहोचला आहे.

औरंगाबादमध्ये आज (28 एप्रिल) 13 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला (Aurangabad Corona Positive Patient) आहे. यात 6 जण हे 16 वर्षाखाली असल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व रुग्णांना औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घाटी रुग्णालयातील अधिष्ठाता कानन येळीकार यांनी याबाबतची माहिती दिली.

औरंगाबादेमध्ये काल (27 एप्रिल) 27 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. त्यानंतर आज 13 जणांचा कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या 24 तासात 43 रुग्ण आढळले आहे. यात हिंगोली जिल्ह्यातील एकाचा समावेश आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.

दरम्यान, याआधी 25 एप्रिल रोजी औरंगाबादमध्ये 24 तासात सर्वाधिक 7 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली होती. यात एकाच कुटुंबातील 3 महिलांचा समावेश होता. या तिन्ही महिलांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. औरंगाबादमध्ये आतापर्यंत 83 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या सर्वांवर औरंगाबादमधील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत आहे.

औरंगबाद शहरात आतापर्यंत 16 कोरोना रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यात जिल्हा रुग्णालयातील 14 तर खासगी रुग्णालयातील 2 अशा 16 रुग्णांचा समावेश आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना मराठवाड्यातील 8 पैकी 3 जिल्हे कोरोनामुक्त झाले आहे. औरंगाबाद वगळता इतर 4 जिल्ह्यांमध्येही कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव नियंत्रणात आहे. त्यामुळे मराठवाड्यातील किमान 7 जिल्हे लवकरचं कोरोनावर मात करण्याची शक्यता (Aurangabad Corona Positive Patient)  आहे.

संबंधित बातम्या : 

नागपूरचे हॉटस्पॉट ठरलेल्या सतरंजीपुरात 450 जण क्वारंटाईन, कोरोनाबाधितांचा आकडा वाढताच

मालेगावात आणखी 36 कोरोना पॉझिटिव्ह सापडले, 9 वर्षाच्या मुलाचाही समावेश