नेपाळमध्ये भारतीय न्यूज चॅनल बघण्यास बंदी, सरकार आणि पंतप्रधानांच्या गैरप्रचाराचा आरोप

नेपाळ आणि भारतातील तणावपूर्ण संबंधांनंतर नेपाळच्या सरकारने भारतीय न्यूज चॅनलवर बंदी घातली आहे (Ban on Indian News Channel in Nepal).

नेपाळमध्ये भारतीय न्यूज चॅनल बघण्यास बंदी, सरकार आणि पंतप्रधानांच्या गैरप्रचाराचा आरोप
Follow us
| Updated on: Jul 09, 2020 | 11:04 PM

काठमांडू : नेपाळ आणि भारतातील तणावपूर्ण संबंधांनंतर नेपाळच्या सरकारने भारतीय न्यूज चॅनलवर बंदी घातली आहे (Ban on Indian News Channel in Nepal). भारतीय न्यूज चॅनल नेपाळ सरकार आणि पंतप्रधानांची बदनामी करत असून गैरप्रचार करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. (India Nepal Dispute) याबाबत नेपाळमधील केबल प्रोव्हायडर्सने भारतीय वृत्तसंस्था एएनआयला दिली आहे.

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, “नेपाळमध्ये भारतीय न्यूज चॅनलचे सिग्नल बंद करण्यात आले आहेत, अशी माहिती नेपाळी केबल प्रोव्हायडर्स दिली. असं असलं तरी आतापर्यंत नेपाळ सरकारकडून अधिकृत आदेश काढण्यात आलेला नाही.”

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

नेपाळमधील माध्यमांनुसार माजी उपपंतप्रधान आणि सत्ताधारी नेपाळ कम्युनिस्ट पक्षाचे प्रवक्ते नारायण काजी श्रेष्ठ म्हणाले, “नेपाळ सरकार आणि आमचे पंतप्रधान यांच्याविरोधात भारतीय माध्यमं विनाआधार प्रचार करत आहेत. त्यांनी सर्व मर्यादा ओलंडल्या आहेत. आता हे अती झालं आहे. भारतीय माध्यमांनी आपली बडबड बंद करावी.”

नेपाळच्या पंतप्रधानांना संसदेपासून रस्त्यांपर्यंत विरोध

नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांचा त्यांच्या काही निर्णयांमुळे देशाच्या संसदेपासून रस्त्यापर्यंत विरोध होत आहे. अगदी त्यांच्या पक्षातील सहकाऱ्यांनी आणि मंत्रीमंडळातील मंत्र्यांनीही विरोध केला आहे. एकीकडे नेपाळमधील विरोध पक्ष ओली यांच्या परराष्ट्र धोरणावर सडकून टीका करत आहेत. दुसरीकडे नेपाळच्या नागरिकांनीही ओली यांच्या विरोधात रस्त्यावर येत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यास सुरुवात झाली आहे. के. पी. ओली यांच्या स्वतःच्या पक्षाने देखील त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

चीनविरोधात नेपाळमध्ये आंदोलने

नेपाळमधील लोक चीनचे राजदूत हाओ यान्की आणि काठमांडूमध्ये चीनविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळेच के. पी. ओली सरकारमधील सहकारी आणि विरोधी पक्ष यांच्या निशाण्यावर आले आहेत. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, मागील 48 तासांमध्ये ते नेपाळच्या अनेक वरिष्ठ नेत्यांना भेटले. यात माजी पंतप्रधान माधव कुमार आणि झाला नाथ खनाल यांचाही समावेश आहे.

हेही वाचा :

Nepal India Border | चीननंतर नेपाळनेही बेटकुळ्या दाखवल्या, भारताच्या तीन प्रांतांवर दावा, नव्या नकाशालाही मंजुरी

नकाशा वादात नेपाळची माघार, भारताच्या क्षेत्राला नकाशात दाखवण्याचा प्रस्ताव नेपाळकडून मागे

Ban on Indian News Channel in Nepal

Non Stop LIVE Update
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?.