लॉकरमधून 11 लाखाचे दागिने चोरले, चौकीदारच चोर निघाला!

| Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM

चंदीगढ : सोसायटी, बँक, कंपनी या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षारक्षकाची नेमणूक केली जाते. मात्र चंदीगढमधील बॅंकेतील सुरक्षा रक्षकानेच एका महिलेचे 11 लाख रुपयांचे दागिने चोरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणामुळे परिसरातील स्थानिक लोकांचा सुरक्षा रक्षकांवरील विश्वास उडाला आहे. पंचकुला सेक्टर 6 मध्ये राहणाऱ्या देविका महाजन 7 मार्चला मनीमाजरा जवळील ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्समध्ये […]

लॉकरमधून 11 लाखाचे दागिने चोरले, चौकीदारच चोर निघाला!
Follow us on

चंदीगढ : सोसायटी, बँक, कंपनी या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षारक्षकाची नेमणूक केली जाते. मात्र चंदीगढमधील बॅंकेतील सुरक्षा रक्षकानेच एका महिलेचे 11 लाख रुपयांचे दागिने चोरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणामुळे परिसरातील स्थानिक लोकांचा सुरक्षा रक्षकांवरील विश्वास उडाला आहे.

पंचकुला सेक्टर 6 मध्ये राहणाऱ्या देविका महाजन 7 मार्चला मनीमाजरा जवळील ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्समध्ये दागिने ठेवण्यास गेल्या होत्या. मात्र देविका यांनी दागिने लॉकरमध्ये न ठेवता बाहेरच ठेवले आणि त्या लॉकर बंद करुन निघून गेल्या. त्यानंतर 13 मार्च रोजी त्या दागिने नेण्यासाठी पुन्हा बँकेत आल्या. मात्र देविका यांनी लॉकर उघडताच, त्यांना दागिने लॉकरमध्ये दिसेल नाहीत.

त्यानंतर देविका यांनी बँकेतील कर्मचाऱ्यांकडे विचारपूस केली. मात्र कर्मचाऱ्यांनी याबाबत काहीच कल्पना नसल्याचे सांगितले. मात्र संतप्त झालेल्या देविका यांनी मनीमाजराजवळील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. देविका यांच्या चोरीला गेलेल्या दागिन्यांमध्ये 25 तोळे सोनं आणि एक हिऱ्याचा तोड्याचा समावेश असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी याबाबत चौकशी सुरू केली.

चौकशीदरम्यान पोलिसांनी देविका दागिने विसरलेल्या तारखेचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी देविका दागिन्यांची पिशवी लॉकरजवळच विसरल्याचे  पोलिसांना दिसले. त्यानंतर त्या लॉकर बंद करुन बाहेर पडल्या. लॉकर रुममधून बाहेर गेल्यानंतर तिथे बँकेतील विविध ग्राहक आले होते. मात्र त्यावेळी ग्राहकांमध्ये बँकेतील सुरक्षारक्षक अशोक कुमार हा सुद्धा आल्याचे पोलिसांना दिसले. त्यानंतर पोलिसांनी बँकेतील सर्व कर्मचाऱ्यांची, सर्व ग्राहकांची चौकशी केली. तसेच पोलिसांनी अशोक कुमार याचीही चौकशी केली. मात्र चौकशीत पोलिसांना अशोकवर संशय आला.

त्यानंतर पोलिसांनी अशोकची चौकशी केली असता, त्याने दागिने घेतल्याचे कबूल केले. तसेच दागिन्यांची पिशवी घरातील वॉशिंग मशीनजवळ लपवल्याचे सांगितले. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून अशोक दागिने विकण्यासाठी एका ग्राहकाच्या शोधात होता. हेही पोलिसांना चौकशीदरम्यान समजले. सध्या पोलिसांनी अशोकला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून दागिने जप्त करण्यात आले आहेत.