सामूहिक ‘माती स्नाना’चा विश्वविक्रम

सांगली : सांगलीतल्या पद्माळे गावात राष्ट्रीय निसर्गोपचार दिनानिमित्त अनोख्या विक्रमाची नोंद करण्यात आली. अंगाला माती फासून 102 जणांनी ‘माती स्नान’ केलं. आयुष मंत्रालय, भारत सरकार आणि दिल्लीतील  इंटरनॅशनल नेचरोपॅथी ऑर्गनायझेशन (INO) यांच्या सहकार्याने जय भगवान योग परिवार, योग मित्र पद्माळ यांनी माती स्नानाचा उपक्रम आयोजित केला होता. पद्माळे येथे झालेल्या उपक्रमात 102 लोकांनी माती स्नान […]

सामूहिक 'माती स्नाना'चा विश्वविक्रम
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By:

Jul 05, 2019 | 5:02 PM

सांगली : सांगलीतल्या पद्माळे गावात राष्ट्रीय निसर्गोपचार दिनानिमित्त अनोख्या विक्रमाची नोंद करण्यात आली. अंगाला माती फासून 102 जणांनी ‘माती स्नान’ केलं. आयुष मंत्रालय, भारत सरकार आणि दिल्लीतील  इंटरनॅशनल नेचरोपॅथी ऑर्गनायझेशन (INO) यांच्या सहकार्याने जय भगवान योग परिवार, योग मित्र पद्माळ यांनी माती स्नानाचा उपक्रम आयोजित केला होता.

पद्माळे येथे झालेल्या उपक्रमात 102 लोकांनी माती स्नान केले. तर सांगली येथे झालेल्या उपक्रमात 23 महिलांनी सहभागी घेतला आहे. सकाळी दहा वाजता उपक्रमास प्रारंभ झाला. यावेळी आयएनओचे सांगली जिल्ह्याचे समन्वयक मोहन जगताप यांनी माती स्नानाचे आयुर्वेदिक महत्त्व सांगितले. निसर्गोपचाराची प्रार्थना म्हणण्यात आली. नदीकाठी मोठ्या प्रमाणात चिखल करण्यात आला. त्या चिखलात बसून माती स्नानाचा अनेकांनी आनंद घेतला.

माती स्नानानंतर अर्धा तास सूर्यस्नान झाले. त्यानंतर नदीत जलस्नान करण्यात आली. देशात सर्वच राज्यात एकाच वेळी हा उपक्रम पार पडला.

या उपक्रमाचे व्हिडीओ शूटिंग केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालय आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डला पाठवण्यात आले आहे. सर्व सहभागी व्यक्तींना वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र मिळणार आहे.

निसर्गोपचारांचं महत्त्व अधिकाधिक लोकांना कळावं, हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून केलेल्या या उपक्रमाचं कौतुकही सगळीकडे होताना दिसते आहे. या उपक्रमाची नोंद लवकरच एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डकडून घेतली जाणार असल्याने सहभागी लोकांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.

पाहा व्हिडीओ :

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें