एसपी बालासुब्रमण्यम यांना ‘भारतरत्न’ जाहीर करा, आंध्रचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींचे पंतप्रधानांना पत्र

| Updated on: Sep 29, 2020 | 12:41 PM

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी (Jaganmohan Reddy) यांनी दिग्गज गायक एसपी बालासुब्रमण्यम (SP Balasubrahmanyam) यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ देऊन, त्यांचा मरणोत्तर सन्मान करण्यात यावा अशी विनंती केली आहे.

एसपी बालासुब्रमण्यम यांना ‘भारतरत्न जाहीर करा, आंध्रचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींचे पंतप्रधानांना पत्र
Follow us on

मुंबई : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी (Jaganmohan Reddy) यांनी दिग्गज गायक एसपी बालासुब्रमण्यम (SP Balasubrahmanyam) यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ देऊन, त्यांचा मरणोत्तर सन्मान करण्यात यावा, अशी विनंती केली आहे. या संदर्भात जगनमोहन रेड्डी (Jaganmohan Reddy) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. कोरोनामुक्त झालेल्या एसपी बालासुब्रमण्यम (SP Balasubrahmanyam) यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. या उपचारादरम्यान, शुक्रवारी (29 सप्टेंबर) त्यांनी अखेरचा श्वास घेतला (Bharat Ratna for SP Balasubrahmanyam Jaganmohan Reddy wrote letter to PM Modi).

पंतप्रधानांना भावनिक पत्र लिहीत जगनमोहन रेड्डी म्हणाले,‘आंध्र प्रदेशच्या नेल्लूरमध्ये या प्रतिभावान गायकचा जन्म झाला. तब्बल पाच दशकांचे त्यांचे करिअर संगीत विश्वाचा अविभाज्य आहे. मरणोत्तर ‘भारतरत्न’ ही त्यांच्या योगदानप्रति खरी श्रद्धांजली असेल. त्यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या कलाकृती अलौकिकतेच्या पलीकडच्या आहेत.

एसपी बालासुब्रमण्यम यांना भारतरत्न द्यावा!

आंध्रच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रात पुढे म्हटले की, ‘आपल्या अद्वितीय प्रतिभेने एसपी बालासुब्रमण्यम (SP Balasubrahmanyam) यांनी त्यांच्या कलाकृतींना उच्च स्तरावर नेऊन ठेवले आहे. त्यांच्या अचानक जाण्याने भारतातील चाहत्यांनाच नव्हे, तर जगभरातील मोठ्या कलाकारांना दुःख झाले आहे. त्यांच्या जाण्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरील संगीत क्षेत्राचीही हानी झाली आहे.’ (Bharat Ratna for SP Balasubrahmanyam Jaganmohan Reddy wrote letter to PM Modi).

‘भारतरत्न’ पुरस्काराने गौरवण्यात आलेल्या संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांचा उल्लेख करत जगनमोहन रेड्डी (Jaganmohan Reddy) म्हणतात, ‘लता मंगेशकर, भूपेन हजारिका, एमएस सुब्बलक्ष्मी, उस्ताद बिस्मिल्ला खान, पंडित भीमसेन जोशी यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. संगीत क्षेत्रातील बहुमुल्य योगदानाबद्दल महान गायक एसपी बालासुब्रमण्यम (SP Balasubrahmanyam) यांनाही भारतरत्न देऊन सन्मानित करावे, अशी विनंती.’

जगनमोहन रेड्डींच्या मागणीला अभिनेता कमल हसनचा पाठिंबा

आंध्र प्रदेश मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींच्या (Jaganmohan Reddy) या मागणीला अभिनेता कमल हसन यांनीदेखील पाठिंबा दर्शवला आहे. मुख्यमंत्री रेड्डींनी पंतप्रधानांना पाठविलेल्या विनंतीपत्राची प्रत ट्विटरद्वारे शेअर करत कमल हसन यांनी लिहिले की,‘आमचे बंधू एसपी बालासुब्रमण्यम (SP Balasubrahmanyam) यांना जो सन्मान मिळावा अशी तुमची इच्छा आहे, तीच इच्छा त्यांच्या चाहत्यांची देखील आहे. केवळ तामिळनाडूच नव्हे, तर संपूर्ण देशभरातील चाहत्यांची हीच मनोकामना आहे.’

उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास

एसपी बालासुब्रमण्यम यांना कोरोनाची लागण झाल्याने 5 ऑगस्ट रोजी चेन्नईच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एसपी बालासुब्रमण्यम यांनी स्वत: गेल्या महिन्यात फेसबुकवर आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांच्या चाहत्यांना दिली होती. कोरोनामुक्त झाल्यानंतरही त्यांच्यावर गेल्या दीड महिन्यापासून उपचार सुरु होते. या उपचारा दरम्यान, शुक्रवारी (29 सप्टेंबर) त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

(Bharat Ratna for SP Balasubrahmanyam Jaganmohan Reddy wrote letter to PM Modi)

संबंधित बातम्या : 

सूरांचा बादशाह हरपला, ज्येष्ठ पार्श्वगायक एसपी बालासुब्रमण्यम यांचे निधन

दाक्षिणात्य ‘रफी’ अशी ओळख मिळवणाऱ्या एसपींना बनायचे होते ‘इंजिनीअर’!

…आणि ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये एस. पी. बालासुब्रमण्यम यांच्या नावाची नोंद झाली!