सूरांचा बादशाह हरपला, ज्येष्ठ पार्श्वगायक एसपी बालासुब्रमण्यम यांचे निधन

बालासुब्रमण्यम यांना कोरोनाची लागण झाल्याने 5 ऑगस्ट रोजी चेन्नईच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

सूरांचा बादशाह हरपला, ज्येष्ठ पार्श्वगायक एसपी बालासुब्रमण्यम यांचे निधन

चेन्नई : अलौकिक आवाजाने रसिकांवर मोहिनी घालणारे प्रसिद्ध पार्श्वगायक एसपी बालासुब्रमण्यम (Singer SP Balasubrahmanyam) यांची प्राणज्योत मालवली. गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर चेन्नईतील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र गेल्या 24 तासात त्यांची प्रकृती नाजूक झाली होती. (Singer SP Balasubrahmanyam Passed Away)

बालासुब्रमण्यम यांना कोरोनाची लागण झाल्याने 5 ऑगस्ट रोजी चेन्नईच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. एसपी बालासुब्रमण्यम यांनी स्वत: गेल्या महिन्यात फेसबुकवर आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांच्या चाहत्यांना दिली होती. गेल्या दीड महिन्यापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. बालासुब्रमण्यम (Singer SP Balasubrahmanyam) यांची प्रकृती नाजूक असल्याची माहिती समजल्यानंतर अभिनेता कमल हसन काल एमजीएम रुग्णालयात त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी गेला होता.

बालासुब्रमण्यम यांनी तामिळ, तेलुगू, कन्नडसह हिंदी भाषेतही अनेक गाणी गायली होती.

एसपी बालासुब्रमण्यम यांची गाजलेली हिंदी गाणी

तेरे मेरे बीच में – एक दुजे के लिये
ओ मारिया – सागर
मेरे रंग में रंगने वाली- मैंने प्यार किया
आया है राजा – अप्पू राजा
बहुत प्यार करते है – साजन
रोजा जानेमन – रोजा

(Singer SP Balasubrahmanyam Passed Away)

दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली :

(Singer SP Balasubrahmanyam Passed Away)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *