इंडियन कॉर्पोरेशनच्या गोदामाला भीषण आग; साहित्यामुळे आग पसरण्याची शक्यता

| Updated on: Jun 01, 2022 | 11:43 PM

गोदामातील ठेवण्यात आलेले साहित्य, कच्चा माल जळून खाक झाला आहे. ज्या गोदामाला आग लागली आहे, त्याच्या जवळ असणाऱ्या इमारतींना आग लागू नये म्हणून प्रयत्न केले जात आहेत. मात्र आगी मोठ्या प्रमाणात पसरली आहे.

इंडियन कॉर्पोरेशनच्या गोदामाला भीषण आग; साहित्यामुळे आग पसरण्याची शक्यता
Follow us on

भिवंडीः भिवंडी तालुक्यातील दापोडा ग्रामपंचायत (Dapoda Grampanchayat) हद्दीतील इंडियन कॉर्पोरेशन (Indian Corporation) या गोदाम संकुलात भीषण आग लागली आहे. ही आग पेपर साठविलेल्या गोदामात लागली असल्याने ती पसरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गोदामातील साहित्यालाही काही अंशी आग लागली असल्याने आणि ती जर पसरत गेली तर मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. गोदामात असणाऱ्या प्लास्टीकच्या साहित्यामुळे आग पसरत असून धुराचे लोट बाहेर पडत आहेत. या घटनेची माहिती अग्नि शमन दलाला दिली असून त्यांच्याकडून ही आग अटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.

 

भिवंडी तालुक्यातील दापोडा ग्रामपंचायत हद्दीतील इंडियन कॉर्पोरेशन या गोदाम संकुलात सायंकाळी भीषण आग लागली. प्लास्टीक आणि ज्वलनशील पदार्थामुळे आग गोदामामध्ये पसरत गेली.

कच्चा माल जळून खाक

त्यामुळे गोदामातील ठेवण्यात आलेले साहित्य, कच्चा माल जळून खाक झाला आहे. ज्या गोदामाला आग लागली आहे, त्याच्या जवळ असणाऱ्या इमारतींना आग लागू नये म्हणून प्रयत्न केले जात आहेत. मात्र आगी मोठ्या प्रमाणात पसरली आहे.

प्लास्टीकमुळे आग पसरत गेली

ज्वलनशील पदार्थामुळे आणि प्लास्टीकमुळे आग पसरत गेली आहे. अग्निशमन दलाच्या साहित्याने या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र गोदामातील प्लास्टीक आणि इतर साहित्य ज्वलनशील असल्यामुळे आग पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
गोदामाला लागलेल्या या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. या आगीचे नेमके कारण अजून समजू शकले नाही, मात्र अग्नि शमन आणि खासगी टँकरच्या मदतीने ही आग अटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.