Bigg Boss 14 | अली गोनीकडे घराची सूत्रे, निक्कीकडून नियमांचे उल्लंघन!

राहुल वैद्य आणि अली गोनी (Aly Goni) यांच्या ‘करारी’खेळीनुसार बिग बॉसमध्ये कर्णधारपदाचा (Captain) टास्क पुढे सरकताना दिसला.

Bigg Boss 14 | अली गोनीकडे घराची सूत्रे, निक्कीकडून नियमांचे उल्लंघन!

मुंबई :बिग बॉस 14’च्या (Bigg Boss 14) घरात कर्णधारपदाची टास्क ‘पार्टी’ या भागातही सुरू होती. राहुल वैद्य आणि अली गोनी (Aly Goni) यांच्या ‘करारी’खेळीनुसार बिग बॉसमध्ये कर्णधारपदाचा (Captain) टास्क पुढे सरकताना दिसला. गेल्या भागामध्ये राहुल आणि अली यांच्यासोबत अभिनव शुक्ला आणि जस्मीन भसीनसुद्धा कर्णधारपदाबद्दल एकमेकांशी बोलताना दिसले. अलीबरोबरच अभिनवनेही कर्णधार होण्याची इच्छा व्यक्त केली. अभिनवच्या कर्णधार होण्याच्या इच्छेवर राहुल वैद्य याने आक्षेप घेतला. दुसरीकडे, कर्णधारपदासाठी राहुलची अलीशी मैत्री पवित्राला आवडलेली नाही. अखेर कर्णधारपदाची माळ अली गोनीच्या गळ्यात पडली (Bigg Boss 14 Aly Goni New Captain of the house).

मैत्रीत फूट

राहुल वैद्यच्या अलीशी हातमिळवणीवर नाराज झालेल्या पवित्रा पुनियाला राहुलने समजावण्याचा खूप प्रयत्न केला. या आधी  राहुल वैद्यला नॉमिनेशनपासून सुरक्षित करण्यासाठी पवित्राने तिच्या 10 कपड्यांचा ‘बळी’ दिला होता. यावरूनच पवित्रा राहुलवर रागावली होती. आताच घरात आलेला अली गोनी घराचा पुढचा कर्णधार होणे, पवित्राला मान्य नव्हते. कर्णधारपदाच्या टास्कबाबत, पवित्राने एजाज खानशीही चर्चा केली. अली देखील पवित्राला समजावण्याचा खूप प्रयत्न करतो. परंतु, पवित्रा कोणाचेही ऐकत नाही.

कर्णधारपदाच्या टास्कमध्ये निक्की तंबोली आणि राहुल वैद्य इतर स्पर्धकांच्या बहुमताने बाद झाले आहेत. दोन्ही स्पर्धक बहुमताने कर्णधारपदाच्या टास्कमधून बाहेर पडल्यानंतर पवित्रा आणि शार्दुल स्वत: नियमांचे उल्लंघन करत खेळातून बाहेर पडले आहेत. अखेर अभिनवदेखील या खेळातून बाहेर पडला आहे. अभिनव आऊट झाल्यानंतर जास्मीन आणि अली यांच्यात कर्णधारपदाचा टास्क सुरू झाला. तर, काहीवेळाने कांटाळलेली जास्मीन खेळातून माघार घेते आणि खेळात टिकून राहिलेल्या अली गोनीला घराचा नवा कर्णधार घोषित केले (Bigg Boss 14 Aly Goni New Captain of the house).

निक्कीचे कर्णधाराविरुद्ध बंड

अली गोनी कर्णधार झाल्यावर घरात निक्कीसाठी बर्‍याच वेळा ‘कुकडू कु’ वाजवला गेला होता. निक्की बराच वेळ घरात झोपून राहिली होती. ‘बिग बॉस’चा गजर वाजत असूनही निक्कीला फारसा फरक पडला नव्हता. अलीने निक्कीला शक्य तितक्या सगळ्या मार्गाने समजावण्याचा प्रयत्न केला. पवित्रा आणि एजाज यांनीही अली आणि निक्की यांच्यात समजोता करण्याचा प्रयत्न केला. निक्कीचा हा हट्ट पाहून शेवटी अलीनेही तिला तिच्याच भाषेत समजवण्याचा निश्चय केला आहे.

(Bigg Boss 14 Aly Goni New Captain of the house)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI