लॉकडाऊनमुळे अपघातात मोठी घट, गेल्या 15 वर्षात सर्वात कमी नोंद

| Updated on: Oct 28, 2020 | 4:20 PM

नऊ महिन्यात 76 जणांना रस्ते अपघातात बळी गेला असला तरी गतवर्षीपेक्षा अपघतांची आणि बळींची संख्या कमी झाल्याचं आकडेवारीवरून दिसून येत आहे.

लॉकडाऊनमुळे अपघातात मोठी घट, गेल्या 15 वर्षात सर्वात कमी नोंद
Follow us on

रत्नागिरी : गेल्या काही दिवसांमध्ये अपघाताची धक्कादायक प्रकरणं समोर आली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग आणि अंतर्गत मार्गांवर नऊ महिन्यात 69 अपघातांमध्ये तब्बल 76 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. नऊ महिन्यात 76 जणांना रस्ते अपघातात बळी गेला असला तरी गतवर्षीपेक्षा अपघतांची आणि बळींची संख्या कमी झाल्याचं आकडेवारीवरून दिसून येत आहे. (biggest drop in accidents due to lockdown lowest recorded in the last 15 years)

कोकणात येणाऱ्या तसंच गोव्याकडे जाणाऱ्या गाड्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे साहजिकच अपघाताचे प्रमाणही तेवढंच वाढलं होतं. मात्र, कोरोनामुळे मार्च महिन्यापासून देशात लॉकडाऊन सुरू आहे. काही महिने जिल्हा बंदी असल्याने वाहनांची वाहतूक पुर्णत: ठप्प झाली होती. त्यामुळे एकूण अपघातात मोठी घट झाली आहे.

महिन्याला मृतांची संख्या 50 च्या आसपास असते. मात्र, लॉकडाऊन काळात ही संख्या 10च्या खाली आली आहे. तर एप्रिल महिन्यात रस्ते अपघातात एकाचाही मृत्यू झालेला नाही. जानेवारी ते सप्टेंबर या कालवधीत एकूण 222 अपघात झाले. त्यापैकी 69 अपघातात 76 जणांचा बळी गेला. जानेवारी माहिन्यात 11, फेब्रुवारी 14, मार्च 7, एप्रिल 0, मे 7, जून 10, जुलै 8, ऑगस्ट 10, सप्टेंबर 9 असा मृतांचा समावेश आहे.

एकूण 222 अपघातामध्ये 69 अपघातात ७६ जणांचा मृत्यू झाला आहे. 73 अपघातात 158 जण गंभीर जखमी झाले तर 51 अपघातात 136 जण किरककोळ जखमी झाले आहे. तर 29 अपघातात केवळ वाहनांचे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात लॉकडाऊन काळापासून रस्ते अपघात मोठी घट झाली आहे. गेल्या पंधरा वर्षातील सर्वात कमी अपघाताची नोंद यावर्षी झाली. पुन्हा आता वाहतूकीला परवानगी देण्यात आल्यामुळे ऑक्टोबर महिन्यात काही प्रमाणात अपघातांमध्ये वाढ झाली आहे.

इतर बातम्या –

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या उत्पन्नात मोठी घट; देवस्थान समित्यांची आर्थिक घडी विस्कटण्याची भीती

गुगल, फेसबुक आणि ट्विटरला झटका; राजकीय जाहिरातींवर बंदी, अमेरिका निवडणुकीपूर्वी दणका

(biggest drop in accidents due to lockdown lowest recorded in the last 15 years)