तक्रार केली एक लाख चोरीला गेल्याची, पोलिसांनी वसूल केले 70 लाख

| Updated on: Oct 18, 2019 | 9:02 PM

पश्चिम दिल्लीतील हौजखास पोलिसांनी सर्वात अनोखी अशी कामगिरी केली. बुधवारी (16 ऑक्टोबर) एका व्यावसायिकाने पोलिसांत एक लाख रुपये चोरी (Biker theft one lakh rupees new delhi) झाल्याची तक्रार दाखल केली होती.

तक्रार केली एक लाख चोरीला गेल्याची, पोलिसांनी वसूल केले 70 लाख
Follow us on

नवी दिल्ली : पश्चिम दिल्लीतील हौजखास पोलिसांनी सर्वात अनोखी अशी कामगिरी केली. बुधवारी (16 ऑक्टोबर) एका व्यावसायिकाने पोलिसांत एक लाख रुपये चोरी (Biker theft one lakh rupees new delhi) झाल्याची तक्रार दाखल केली होती. बुलेटवर प्रवास करणाऱ्या तरुणांनी माझ्या गाडीतले पैसे आणि परदेशी करन्सी चोरीला (Biker theft one lakh rupees new delhi) गेली आहे, असं त्या तक्रारीत म्हटले होते. पण पोलिसांनी चोरांकडून तब्बल 70 लाख रुपयांची वसुली केली आहे.

व्यावसायिकाने एक लाख रुपये चोर झाल्याचे तक्रार दाखल केली होती. पण तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटना स्थळाजवळील सीसीटीव्ही तपासले आणि चोरांना अटक केली. त्यानंतर त्यांच्याजवळील रक्कम जप्त केली. ही रक्कम पोलिसांनी मोजली असता 70 लाख रुपये चोरी झाल्याचे समोर आले. त्यामुळे पोलीसही हैराण झाले.

पोलिसांकडून व्यावसायिकाची कसून चौकशी

या घटनेनंतर तक्रार करणाऱ्या व्यावसायिकाची पोलीस कसून चौकशी करत आहेत. पवन असं या व्यावसायिकाचे नाव आहे. मला खरच अंदाज नव्हता की, पोलीस एवढ्या कमी वेळात चोराचा शोध घेतील. माझ्या मित्राच्या सांगण्यावरुन मी एक लाख आणि इतर सामान चोरी गेल्याची तक्रार दाखल केली होती.

“पवनच्या गाडीतून एक लाख रुपयांशिवाय 70 हजार रुपयांची परदेशी करन्सीही चोरी झाली होती. सर्व पैसे वसूल केले आहे. एवढे पैसे आणि परदेशी करन्सी कुठून आली याचा तपास संबधित विभाग करत आहे”, असं डीसीपी अतुल ठाकूर यांनी सांगितले.

व्यावसायिक बुधवारी फरीदाबादच्या दीशेने जात होते. हौज खासजवळ दोन तरुणांनी इशार केला की, माझी कार पंक्चर आहे. मी कार बाजूला लावून तपासले, तेव्हा त्या तरुणांनी माझ्या गाडीतील बॅग घेऊन पळ काढला, असं त्या तक्रारीत म्हटले होते.