AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mamta banerjee : ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल करा, राष्ट्रगीताचा अवमान केल्याची भाजपची तक्रार

राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशा मागणीचे पत्र आज भारतीय जनता पक्षाचे वसई-विरार जिल्हा युवा अध्यक्ष अभय कक्कड यांनी आचोळे पोलीस ठाण्यात दिलं आहे.

Mamta banerjee : ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल करा, राष्ट्रगीताचा अवमान केल्याची भाजपची तक्रार
ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, पश्चिम बंगाल
| Edited By: | Updated on: Dec 03, 2021 | 8:08 PM
Share

वसई :  राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशा मागणीचे पत्र आज भारतीय जनता पक्षाचे वसई-विरार जिल्हा युवा अध्यक्ष अभय कक्कड यांनी आचोळे पोलीस ठाण्यात दिलं आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या नुकत्याच मुंबई दौऱ्यावर आल्या होत्या. त्यांच्या दौऱ्यादरम्यान बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या, काँग्रेस आणि ममता बॅनर्जी यांच्यात शाब्दीक टीका झाल्याचंही पहायला मिळालं आणि आता भाजपने ही मागणी केली आहे.

राष्ट्रगीत पूर्ण न होताच निघाल्याचा आरोप

ममता बॅनर्जी या एका कार्यक्रमा दरम्यान कार्यक्रम संपताना देशाच्या राष्ट्रगीताच्या चार-पाच ओळी उच्चारुन राष्ट्रगीत पूर्ण न करताच तेथून निघून गेल्या.  त्यांची ही कृती देशाच्या राष्ट्रगीताच्या प्रती असंवेदनशीलता आणि अपमान करणारी असून, ममता बॅनर्जी यांच्यावर प्रिविशनल ऑफ इन्सल्ट टू नॅशनल हॉनर 1971 च्या कलम 3 अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी करणारे पत्र भाजपाचे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अभय कक्कड यांनी आचोळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरवदे यांना दिलं आहे.

ममता बॅनर्जी यांच्यावर महाराष्ट्रात गुन्हा दाखल होणार?

भाजपच्या या तक्रारीनंतर पोलिसांकडून अद्याप कोणतीही कायदेशीर बाजू मांडण्यात आली नाही, किंवा याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे पोलिसांची याबाबत भूमिका काय आहे? हे अद्याप अस्पष्ट आहे. पण आधीच वादळी ठरलेला ममता बॅनर्जी यांचा मुंबई दौरा आणखी वादग्रस्त ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपच्या या तक्रारीनंतर ममता बॅनर्जी यांच्यावर गुन्हा दाखल होणार का? हेही पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

राज्य सहकार बँक प्रकरणातील आरोपींना सोडवण्यासाठी सहकार मंत्र्यांमार्फत प्रयत्न : केशव उपाध्ये

Gunratna Sadavarte | एसटी विलीनीकरणीशिवाय मेस्मा लागू शकत नाही – गुणरत्न सदावर्ते

St worker strike : ‘मेस्मा’ लावायचा असेल तर आधी विलिनीकरण करावं लागेल, कायद्याच्या अभ्यासावरुन गुणरत्न सदावर्तेंचा अनिल परबांना टोला

दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.