St worker strike : ‘मेस्मा’ लावायचा असेल तर आधी विलिनीकरण करावं लागेल, कायद्याच्या अभ्यासावरुन गुणरत्न सदावर्तेंचा अनिल परबांना टोला

जो पर्यंत राज्य शासनात विलिनीकरण होत नाही, तोपर्यंत मेस्मा लागत नाही असं सदावर्ते म्हणालेत. एसटी कर्मचारी गुन्हे दाखल होणार समजूनस त्यामुळे ते घाबरले आहेत. त्यांना घाबरवू नका असा इशाराही त्यांनी दिला आहे.

St worker strike  : 'मेस्मा' लावायचा असेल तर आधी विलिनीकरण करावं लागेल, कायद्याच्या अभ्यासावरुन गुणरत्न सदावर्तेंचा अनिल परबांना टोला
अनिल परब आणि गुणरत्न सदावर्ते.

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरून अनिल परब आणि गुणरत्न सदावर्ते यांच्याच चांगलीच जुंपली आहे. अनिल परब यांनी मेस्मा लावण्याचा इशारा दिला आहे तर त्याला गुणरत्न सदावर्ते यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्यानी अनिल परबांच्या कायद्याच्या अभ्यासावरही काही सवाल उपस्थित केले आहेत. तर सरकार एसटी कर्मचाऱ्यांमध्ये भितीचं वातावरण तयार करत असल्याचा आरोपही गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हा वाद वाढताना पहायला मिळत आहे.

विलिनीकरण होत नाही तोपर्यंत मेस्मा लागत नाही

पहिवहन मंत्री अनिल परबांना उत्तर देताना सदावर्ते म्हणतात, भारतीय राज्यघटनेचा मी अभ्यासक आहे,  सरकार पराभूत मानसिकतेत आहे. नांदेडमध्ये एका वाहकाचा मृत्यू झाला आहे. अनिल परब भीती निर्माण करत आहेत पण मी अर्णब गोसावी किंवा अभिनेता, अभिनेत्री नाही असा टोला गुणरत्न सदावर्तेंनी अनिल परबांना लगावला आहे.

परबांच्या वकिलीच्या डिग्रीवरून सवाल

त्यांनी परबांच्या वकिलीच्या डिग्रीवरही सवाल उपस्थित केले आहेत. माणसं डिग्री घेतात मात्र कायद्याचा त्यांनी किती अभ्यास केला हा प्रश्न आहे. मेस्माचा माझा अभ्यास आहे, जो पर्यंत राज्य शासनात विलिनीकरण होत नाही, तोपर्यंत मेस्मा लागत नाही असं सदावर्ते म्हणालेत. एसटी कर्मचारी गुन्हे दाखल होणार समजूनस त्यामुळे ते घाबरले आहेत. लोकांचे जीव जातात तुमच्या विधानामुळे ह्यासाठी मी पोलिस महासंचालकांना पत्र लिहिले आहे, असंही सदावर्ते म्हणालेत.

मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांचे ऐकू नये

मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांचे ऐकू नये. आमच्या मतानं हा आमचा दुखवटा आहे. आर्टिकल 19, 12 वाचत नाहीत हे असा टोलाही सदावर्ते यांनी लगावलाय. मात्र याबाबत एसटी कर्मचारी काय भूमिका घेतात हे पाहणं जास्त महत्वपूर्ण आहे.

Anil Parab | एसटी पगारवाढ मागे घेण्याचा प्रश्नच नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका- अनिल परब

विधानसभा अध्यक्षपदाची निवड हिवाळी अधिवेशनातच, नाना पटोलेंकडून स्पष्ट; देवेंद्र फडणवीसांनाही प्रत्युत्तर

Indian army : युद्ध झाल्यास 1971 सारखे हाल करू, मराठमोळ्या लष्करप्रमुखांची डरकाळी

Published On - 7:26 pm, Fri, 3 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI