Gunratna Sadavarte | एसटी विलीनीकरणीशिवाय मेस्मा लागू शकत नाही – गुणरत्न सदावर्ते

भारतीय राज्यघटनेचा मी अभ्यासक आहे. सरकार पराभूत मानसिकतेत आहे. अनिल परब भीती निर्माण करत आहेत. माणसं पदवी घेतात पण त्यांचा कायद्याचा अभ्यास किती आहे हा प्रश्न आहे. मेस्माचा माझा अभ्यास आहे. जो पर्यंत राज्य सरकारमध्ये विलिनीकरण होत नाही तोवर मेस्मा लागत नाही. तुमच्या वक्तव्यांमुळे लोकांचे जीव जात आहेत. त्यासाठी मी पोलीस महासंचालकांना पत्र लिहिलं आहे, असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलंय.

अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना मेस्मा कायद्या अंतर्गत कारवाई करण्याचा सूचक इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा लागत नसल्याचं म्हटलंय. भारतीय राज्यघटनेचा मी अभ्यासक आहे. सरकार पराभूत मानसिकतेत आहे. अनिल परब भीती निर्माण करत आहेत. माणसं पदवी घेतात पण त्यांचा कायद्याचा अभ्यास किती आहे हा प्रश्न आहे. मेस्माचा माझा अभ्यास आहे. जो पर्यंत राज्य सरकारमध्ये विलिनीकरण होत नाही तोवर मेस्मा लागत नाही. तुमच्या वक्तव्यांमुळे लोकांचे जीव जात आहेत. त्यासाठी मी पोलीस महासंचालकांना पत्र लिहिलं आहे, असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलंय.

दरम्यान, मेस्मा हा कायदा अत्यावश्यक सेवेसाठी लागतो. एसटी ही अत्यावश्यक सेवेत आहे. अत्यावश्यक सेवा कायदा 2017 जो आहे त्यात मेस्मा लागतो. मेस्मा लावायचा का याबाबत शासन गंभीरपणे विचार करत आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन याबाबत निर्णय घेतला जाईल. सरकार कठोर पाऊल उचलण्याच्या मानसिकतेत नाही. पण आम्हाला जनतेचाही विचार करावा लागेल. आज सर्व कर्मचारी, अधिकारी, कायदेतज्ज्ञांशी चर्चा केली. त्याबाबत लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल, असं अनिल परब म्हणाले. त्याचबरोबर आतापर्यंत जी कारवाई केली आहे ती कारवाई आता मागे घेणार नाही. संप संपला तरी केलेली कारवाई लवकर मागे घेतली जाणार नाही. या संपाला आता नेता नाही. पण जो कुणी कर्मचाऱ्यांना भडकावत आहे त्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल. कारण आता आम्हाला जनतेला न्याय द्यायचा आहे, असंही परब म्हणाले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI