सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर ट्विटरवर बॉलिवूडविरोधात संताप, #boycottbollywood आणि #KaranJohar ट्रेडिंगमध्ये

| Updated on: Jun 15, 2020 | 7:24 PM

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर ट्विटरवर बॉलिवूडविरोधात संताप व्यक्त केला जात आहे (boycottbollywood trends on twitter).

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर ट्विटरवर बॉलिवूडविरोधात संताप, #boycottbollywood आणि #KaranJohar ट्रेडिंगमध्ये
Follow us on

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर ट्विटरवर बॉलिवूडविरोधात संताप व्यक्त केला जात आहे (boycottbollywood trends on twitter). ट्विटरवर #boycottbollywood, #shameonbollywood, #KaranJohar यासारखे हॅशटॅग ट्रेडिंगमध्ये आहेत. इंडस्ट्रीतल्या कंपूशाहीने (नेपोटिझम) सुशांतला आत्महत्या करण्यास भाग पाडलं, असा आरोप देशभरातील चाहत्यांकडून केला जात आहे. चंदेरी दुनियेतील घराणेशाहीवरुन स्टार किड्सवर टीका केली जात आहे (boycottbollywood trends on twitter).

सुशांतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील अनेक अभिनेते आणि दिग्दर्शकांनी दु:ख व्यक्त केलं आहे. चित्रपट निर्माता करण जोहर आणि अभिनेत्री आलिया भट यांनीदेखील दु:ख व्यक्त केलं. मात्र, ट्विटरवर त्यांना ट्रोल केलं जात आहे.

करण जोहर आणि आलिया भट यांनी व्यक्त केलेल्या भावना खोट्या आहेत, असा आरोप अनेकांकडून केला जात आहे. यादरम्यान, ट्विटरवर ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत करण जोहर आणि आलिया भट यांनी मिळून सुशांतची खिल्ली उडवल्याचा आरोप अनेकांकडून केला जात आहे.

कंगना राणावतचे बॉलिवूडवर गंभीर आरोप

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर अभिनेत्री कंगना राणावतचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओत कंगनाने बॉलिवूडवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. “स्वबळावर नाव कमावणाऱ्या कलाकारांना यशापासून दूर ठेवण्यासाठी इंडस्ट्रीमध्ये षडयंत्र रचलं जातं, इंडस्ट्रीतल्या कंपूशाहीने (नेपोटिझम) सुशांतला आत्महत्या करण्यास भाग पाडलं”, असा घणाघात कंगनाने केला.

कंगनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून बॉलिवूडवर टीका केली जात आहे. यादरम्यान, अभिनेते आणि दिग्दर्शक शेखर कपूर यांनीदेखील केलेलं ट्विट सध्या प्रचंड चर्चेत आलं आहे.

“तू ज्या परिस्थितीतून, तणावातून जात होता त्याची मला जाणीव होती. ज्या लोकांनी तुला कमजोर बनवलं, ज्यांच्यामुळे तू माझ्या खांद्यावर डोकं ठेवून रडलास, त्या सर्वांची गोष्ट मला ठावूक आहे. गेल्या सहा महिन्यात तुझ्यासोबत एकत्र राहायला हवं होतं, तू निदान माझ्याशी बातचीत तरी केली असतीस. जे काही झालं, ते सर्व इतरांचे कर्म होते, तुझे नाही”, असं शेखर कपूर ट्विटवर म्हणाले.

संबंधित बातम्या :

Shekhar kapoor on Sushant Suicide | तुझ्या दु:खाची मला जाणीव होती, जबाबदार कोण याचीही मला कल्पना : शेखर कपूर

Kangana on Sushant Suicide | इंडस्ट्रीतील कंपूशाहीने सुशांतचा बळी घेतला, कंगनाचा बॉलिवूडवर संताप