बुलडाण्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, 5 वर्षाच्या मुलासह तिघांना डिस्चार्ज

| Updated on: Apr 23, 2020 | 4:18 PM

बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने हा जिल्हा कोरोना मुक्तीकडे वाटचाल करत (Buldhana Corona Patient Recovered) आहे. 

बुलडाण्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, 5 वर्षाच्या मुलासह तिघांना डिस्चार्ज
Follow us on

बुलडाणा : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला (Buldhana Corona Patient Recovered) आहे. तर दुसरीकडे बुलडाणा जिल्ह्याने कोरोना मुक्तीकडे वाटचाल केली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील तीन कोरोनाबाधित रुग्णांना आज (23 एप्रिल) डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे बुलडाण्यात आता केवळ 9 कोरोनाबाधित रुग्ण उरले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने हा जिल्हा कोरोना मुक्तीकडे वाटचाल करत आहे.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुलडाण्यातील 3 कोरोनाग्रस्त (Buldhana Corona Patient Recovered) रुग्ण ठणठणीत बरे झाले. त्यांना आज 23 एप्रिल रोजी डिस्चार्ज देण्यात आला. यात एका 5 वर्षीय मुलाचा समावेश असून त्यासोबतच त्याच्या आईलाही डिस्चार्ज देण्यात आला आहे.

बुलडाण्यातील खामगावमधील चितोडा येथील एक आणि शेगाव येथील दोन रुग्ण असे तीन कोरोनाबाधित रुग्ण निगेटिव्ह आले आहेत. काल रात्री उशिरा त्यांचे रिपोर्ट प्राप्त झाले. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने त्यांना घरी सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांना घरी सोडण्यात आलं असलं तरी त्यांना क्वारंटाईनमध्ये राहावं लागणार आहे.

या रुग्णांच्या डिस्चार्जमुळे खामगांव, चितोडा आणि शेगाव आता कोरोनामुक्त झाले आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्याने कोरोनामुक्तीच्या दिशेने पाऊल टाकले आहे.

यापूर्वी 17 एप्रिलला 3, 20 एप्रिलला 5 रुग्ण कोरोनामुक्त झाले होते. त्यानंतर त्या सर्वांना घरी सोडण्यात आले होते. त्यानंतर आज (23 एप्रिल) डिस्चार्ज नंतर आता जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या केवळ 9 उरली आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिली आहे.

बुलडाण्यात एकूण 21 कोरोनाबाधित रुग्ण होते. यातील 11 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आता फक्त 9 कोरोना रुग्ण शिल्लक आहे. तर दुर्देवाने एकाचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात एकही रुग्ण आढळलेला (Buldhana Corona Patient Recovered) नाही.

संबंधित बातम्या : 

मराठवाड्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 62 वर, एकट्या औरंगाबाद शहरात 40 रुग्ण

“घाई नको, भारताने किमान दहा आठवड्यांचा लॉकडाऊन पाळावा”