चंद्रपुरातील अल्पवयीन मुलीची हरियाणात विक्री, दहा वर्षांनी छडा, चार महिलांना अटक, मानवी तस्करीचं मोठं रॅकेट

चंद्रपुरातील अल्पवयीन मुलीला हरियाणात विकल्याचे प्रकरण तब्बल दहा वर्षानंतर उघडकीस आले आहे. याप्रकरणी आतापर्यंत चंद्रपुरातील चार महिलांना अटक करण्यात आली आहे.

चंद्रपुरातील अल्पवयीन मुलीची हरियाणात विक्री, दहा वर्षांनी छडा, चार महिलांना अटक, मानवी तस्करीचं मोठं रॅकेट

चंद्रपूर : चंद्रपुरातील अल्पवयीन मुलीला हरियाणात विकल्याचे प्रकरण तब्बल दहा वर्षानंतर उघडकीस आले आहे. याप्रकरणी आतापर्यंत चंद्रपुरातील चार महिलांना अटक करण्यात आली आहे. या मानवी तस्करीच्या (Chandrapur Human trafficking) प्रकरणाचा छडा लावण्यासाठी स्थापन केलेले चंद्रपूर पोलिसांचे विशेष पथक आज हरिणायाकडे रवाना झाले. याप्रकरणातील सुमारे 15 आरोपी हरिणायातील विविध जिल्ह्यात असल्याची माहिती आहे. ते हाती लागल्यास मानवी तस्करीची (Chandrapur Human trafficking) साखळीच पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.

पोलीस कोठडीतील आरोपींनी आतापर्यंत वीसपेक्षा जास्त मुली लग्नाच्या नावावर विकल्याची कबुली दिली आहे. गुन्ह्यातील  पीडितेला पोलिसांनी दोन जानेवारीला चंद्रपुरात आणले. त्यानंतर तिला विकणाऱ्या जान्हवी मुजूमदार आणि सावित्री रॉय या दोन महिलांना सहा जानेवारीला पोलिसांनी अटक केली.   गीता मुजूमदारने मुलींना दुसऱ्या राज्यात लग्नाच्या नावावर पाठवत असल्याचं कबुल केलं. गीताला आठ जानेवारीला पोलिसांनी अटक केली.

गीताने दिलेल्या माहितीनुसार जिजाबाई शिंदे हिला पोलिसांनी ताब्यात घेतले. मध्यप्रदेशातील उज्जैन येथील सहा जण क्रृष्णनगर परिसरातील एका गरीब कुटुंबातील मुलीला नेण्यासाठी येणार आहेत, अशी माहिती गीताने पोलिसांना दिली. त्यात जिबाबाईची मध्यस्थी होती, अशी ‘टीप’ तिच्याकडून पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून सहा जणांना नऊ जानेवारीला ताब्यात घेतले.

त्यांच्या चौकशीत जिजाबाई शिंदे हिने सात मुलींचा सौदा केल्याचे समोर आले. या मुली दिल्ली, उत्तरप्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेशात पाठविण्यात आल्या आहेत. पोलीस आता त्यांच्या कुटुंबीयांचा शोध घेत आहे.

हरिणायातील सहा जणांची पोलिसांनी तब्बल तीन दिवस चौकशी केली. मात्र पीडितेच्या कुटुंबीयांनी तक्रार देण्यास नकार दिला. शेवटी पीडितेने यातील दशरथ पाटीदार आणि राजेश प्रजापती (दोघेही मध्यप्रदेशातील) यांनी विनयंभगांचा प्रयत्न केल्याचा जबाब दिला. त्यासाठी जिजाबाईने मदत केली, असा आरोप तिने केला. त्यामुळे तूर्तास पोलिसांनी पाटीदार, प्रजापती आणि जिजाबाईवर भादंवी ३५४, ४५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

दशरथ पाटीदार याने जिजाबाईशी मुली संदर्भात संपर्क साधला होता. त्यानंतर पाटीदार सहा जणांसह दीड लाख घेऊन मुलीच्या घरी पोहचला. मात्र तत्पूर्वीच पोलीस पोहोचले आणि पुढचा अनर्थ टळला.  दुसरीकडे अटकेतील चारही महिलांनी सांगितलेल्या मुलींच्या कुटुंबीयांशी पोलिस संपर्क साधत आहेत. आता मुलगी नेमकी कुठे आहे, याची माहिती घेत आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI