अनुपम खेर कोरोना निगेटिव्ह, मातोश्रींसह भावाच्या कुटुंबाला संसर्ग

ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांच्या कुटुंबियांना देखील कोरोनाची लागण झालीय (Corona infection to Anupam Kher mother and family members).

अनुपम खेर कोरोना निगेटिव्ह, मातोश्रींसह भावाच्या कुटुंबाला संसर्ग
Follow us
| Updated on: Jul 12, 2020 | 12:10 PM

मुंबई : कोरोना विषाणूने आता बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींच्या घरातही शिरकाव केला आहे. महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन यांच्यानंतर आता ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांच्या कुटुंबियांना देखील कोरोनाची लागण झालीय (Corona infection to Anupam Kher mother and family members). अनुपम खेर यांची आई, भाऊ, वहिनी, पुतणी यांना संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यांना कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तेथे उपचार सुरु आहेत. अनुपम खेर यांचीही चाचणी घेण्यात आली. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

अनुपम खेर यांची आई दुलारी, भाऊ राजू, वहिणी रिमा आणि पुतणी वृंदा यांच्या कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्या आहेत. स्वतः अनुपम खेर यांनीच ट्विट करत याबाबत माहिती दिली. या सर्वांची प्रकृती स्थिर असून त्यांना सौम्य लक्षणं आहेत. अनुपम खेर यांच्या आईला कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. इतर सदस्यांचं घरातच विलगीकरण करण्यात आलं आहे.

दरम्यान, महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन या दोघांना कोरोनाचा संसर्ग झाला (Amitabh Bachchan Corona Positive) आहे. बच्चन पिता-पुत्रांनी स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती दिली. बच्चन कुटुंबातील इतर सदस्यांच्या देखील कोरोना चाचणी करण्यात  कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाची सौम्य लक्षण आहेत. त्यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरु आहे. बच्चन पिता-पुत्रांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली होती. अमिताभ यांच्या पत्नी खासदार जया बच्चन आणि सून अभिनेत्री ऐश्वर्या राय यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

हेही वाचा :

LIVE: Amitabh Bachchan Corona | बंगला निर्जंतुकीकरणासाठी बीएमसीची कर्मचारी जलसाबाहेर, सुरक्षा रक्षकांकडून प्रवेश नाही

Amitabh Bachchan Corona : “शहंशाह” कोरोनाची “दिवार” तोडून “अग्निपथावर” मात करतील, गृहमंत्र्यांसह राजकीय वर्तुळातून अनेकांच्या प्रतिक्रिया

Bachchan Family Corona report: जया बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्याचा कोरोना अहवाल निगेटीव्ह

Amitabh Bachchan Corona | अमिताभ बच्चन यांच्यासाठी पाकिस्तानातही दुवा, शोएब अख्तरचीही प्रार्थना

Amitabh Bachchan Corona | अमिताभ बच्चन आणि अभिषेकला कोरोना

Corona infection to Anupam Kher mother and family members

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.