Amitabh Bachchan Corona : "शहंशाह" कोरोनाची "दिवार" तोडून "अग्निपथावर" मात करतील, गृहमंत्र्यांसह राजकीय वर्तुळातून अनेकांच्या प्रतिक्रिया

अमिताभ बच्चन यांना कोरोना संसर्ग झाल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. (Anil Deshmukh on Amitabh Bachchan Corona).

Amitabh Bachchan Corona : "शहंशाह" कोरोनाची "दिवार" तोडून "अग्निपथावर" मात करतील, गृहमंत्र्यांसह राजकीय वर्तुळातून अनेकांच्या प्रतिक्रिया

मुंबई : बॉलिवूडमधी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला. यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या (Anil Deshmukh on Amitabh Bachchan Corona). या सर्वांनी त्यांना लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आणि सदिच्छा दिल्या. गृहमंत्री अनिल देशमुख “शहंशाह” कोरोनाची “दिवार” तोडून “अग्निपथावर” मात करतील आणि आपल्या सर्वांना आनंद देतील अशी सदिच्छा व्यक्त केली आहे.

अनिल देशमुख म्हणाले, “महानायक अमिताभ बच्चन हे कोरोनावर मात करुन पुन्हा उत्साहाने नवी ऊर्जा घेऊन आपल्या चाहत्यांसमोर नवीन भूमिका घेऊन परततील. “शहंशाह” कोरोनाची “दिवार” तोडून “अग्निपथावर” मात करुन आपल्याला “आनंद” देतील हीच सदिच्छा.”

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील ट्विट करत अमिताभ बच्चन यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती दिली. ते म्हणाले, “महानायक अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन या दोघांनी त्यांना असलेल्या लक्षणांच्या आधारे कोरोना चाचणी केली. या चाचणीचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. ते दोघेही नानावटी रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना काही सौम्य लक्षणं आहेत.”

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

“अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबातील जया बच्चन आणि ऐश्वर्या बच्चन यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्याचे अहवाल उद्यापर्यंत येतील. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोना चाचणी करण्यास सांगितले आहे. त्यांच्या संपर्कातील लोकांनी चाचणी करावी आणि विलगीकरणात थांबावं. अमिताभ बच्चन हे लवकर बरे व्हावेत अशीच माझी प्रार्थना, असंही राजेश टोपे म्हणाले.


राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही सर्वजण तुमच्या लवकरात लवकर प्रकृती स्वास्थ्यासाठी प्रार्थना करतो. लवकर बरे व्हा.”


राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देखील अमिताभ बच्चन यांना लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा दिल्या आहेत.

संबंधित बातम्या :

LIVE: Amitabh Bachchan Corona | अमिताभ बच्चन आणि अभिषेकची प्रकृती स्थिर, उपचार सुरु

Bachchan Family Corona report: जया बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्याचा कोरोना अहवाल निगेटीव्ह

Amitabh Bachchan Corona | अमिताभ बच्चन यांच्यासाठी पाकिस्तानातही दुवा, शोएब अख्तरचीही प्रार्थना

Amitabh Bachchan Corona | अमिताभ बच्चन आणि अभिषेकला कोरोना

Anil Deshmukh on Amitabh Bachchan Corona

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *