साताऱ्यातील मोदी पेढेवाल्यांना लॉकडाऊनचा फटका, कंदी पेढे रस्त्यावर फेकण्याची वेळ

सातारा शहरातील प्रसिद्ध मोदी, लाटकर, जेपी हे पेढे फार (Corona Lockdown Satara Kandi Pede) प्रसिद्ध आहे. या पेढ्याची मागणी देशभरात आहे.

साताऱ्यातील मोदी पेढेवाल्यांना लॉकडाऊनचा फटका, कंदी पेढे रस्त्यावर फेकण्याची वेळ
| Updated on: Mar 30, 2020 | 4:56 PM

सातारा : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी 21 दिवसांकरिता लॉकडाऊनची (Corona Lockdown Satara Kandi Pede) घोषणा करण्यात आली आहे. देशभरात संचारबंदी लागू केल्यानंतर त्या ठिकाणी घरात थांबून राहावे असे आवाहन पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. अचानक घोषित झालेल्या लॉकडाऊनमुळे मात्र साताऱ्याच्या प्रसिद्ध अशा कंदी पेढे व्यावसायिकांना याचा मोठा फटका बसला आहे.

सातारा शहरातील प्रसिद्ध मोदी, लाटकर, जेपी हे पेढे फार (Corona Lockdown Satara Kandi Pede) प्रसिद्ध आहे. या पेढ्याची मागणी देशभरात आहे. आठवडाभर सुस्थितीत राहणार पेढा मात्र आता बाहेर फेकून देण्याची वेळ व्यापाऱ्यांवर आली आहे. तर शिल्लक राहिलेले सर्व पेढे व्यावसायिकांनी भटक्या कुत्र्यांना आणि माशांना खायला घालायला सुरुवात केली आहे. या ठिकाणी 50 हजारांहून अधिक व्यावसायिकांनी आर्थिक फटका सहन करावा लागला आहे.

कोरोना विषाणू प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशभरात 21 दिवसांचा लॉकडाऊन पाळला जात आहे. यामुळे अनेक पर्यटन स्थळी लोकांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे याचा फटका सर्व व्यापाऱ्यांना बसत आहे.

महाराष्ट्रात कोठे किती रुग्ण?

मुंबई – 88
पुणे – 30
पिंपरी चिंचवड – 12
सांगली – 25
नागपूर –  16
कल्याण – 7
नवी मुंबई – 6
ठाणे – 5
वसई विरार – 4
उल्हासनगर – 1
पनवेल – 2
पालघर- 1
यवतमाळ – 4
अहमदनगर – 5
सातारा – 2
कोल्हापूर – 2
गोंदिया – 1
औरंगाबाद – 1
सिंधुदुर्ग – 1
रत्नागिरी – 1
जळगाव- 1
नाशिक – 1
इतर राज्य (गुजरात) – 01

एकूण 215

संबंधित बातम्या : 

लॉकडाऊनमुळे दुकानं बंद, दारुडे हैराण, डॉक्टरची चिठ्ठी दाखवून दारु मिळणार

Corona | पिंपरी चिंचवडकरांचा नेटाने लढा, 12 पैकी 9 रुग्ण यशस्वी उपचारानंतर घरी