पुण्यात कोरोनामुक्त पोलीस समुपदेशकाची भूमिका बजावणार : रवींद्र शिसवे

| Updated on: Jul 20, 2020 | 10:46 AM

पुण्यात कोरोनामुक्त पोलीस आता समुपदेशकाची भूमिका बजावणार (Pune Police Counselor) आहेत.

पुण्यात कोरोनामुक्त पोलीस समुपदेशकाची भूमिका बजावणार : रवींद्र शिसवे
Follow us on

पुणे : पुण्यात कोरोनामुक्त पोलीस आता समुपदेशकाची भूमिका बजावणार (Pune Police Counselor) आहेत. कोरोनामुक्त 177 पोलीस कोरोनाग्रस्तांचं समुपदेशन करणार आहेत. यासंदर्भात पोलिसांना तज्ञांकडून विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. लवकरच हा अभिनव उपक्रम सुरू होणार असल्याचं सहपोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी (Pune Police Counselor) सांगितलं.

लॉकडाऊनमध्ये पोलिसांनी जीव धोक्यात घालून चोख नाकाबंदी केली. कोरोनाबाबत जनजागृती केली. एवढेच नाही तर अन्नधान्य, मास्क आणि सॅनीटायझर वाटपही केलं. मात्र आता पोलिसांनी आणखी एक अभिनव उपक्रम राबवला आहे. कोरोनामुक्त झालेले पोलीस कोरोनाग्रस्त रुग्णांना मानसिक दिलासा देणार आहेत. कोरोनाग्रस्त रुग्णांचं मानसिक आत्मबल उंचावण्याचा प्रयत्न करणार आहेत. लवकरच शहरात या प्रयोगाला सुरुवात होणार असल्याचं सहपोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी सांगितलं.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

लॉकडाऊनच्या काळात कोरोना योद्ध्यांची भूमिका बजावणारे पोलीस ही कोरोनाग्रस्त झाले आहेत. आतापर्यंत तब्बल 238 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली. 177 पोलीस कोरोनातून बरे झाले असून तब्बल 100 पोलीस पुन्हा कर्तव्यावर रुजू झालेत. उर्वरित 77 पोलीस लवकरच कोरोना योद्ध्याच्या भूमिकेत दिसतील. सध्या 58 रुग्ण उपचार घेत असून तीन पोलिसांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

दरम्यान, राज्यात संचारबंदीच्या काळात पोलिसांवर हल्ल्याच्या घटनेत वाढ झाली आहे. पोलिसांवर 314 ठिकाणी हल्ले झाले आहेत. तर यामध्ये 86 पोलीस जखमी झाले आहेत. पोलिसांनी यामधील 879 हल्लेखोरांना अटक केली आहे.