मोठी बातमी…भारतात कोरोनामुक्त होण्याचा दर 90 टक्क्यांवर, आरोग्य मंत्रालयाची माहिती

| Updated on: Oct 25, 2020 | 5:31 PM

गेल्या 24 तासात भारतात 50129 कोरोना रुग्ण आढळले आहेत त्याचवेळी 62077 जण कोरोनामुक्त झाले आहेत. (Corona Virus infected patient recovery rate reaches at 90 percentage in India)

मोठी बातमी...भारतात कोरोनामुक्त होण्याचा दर 90 टक्क्यांवर, आरोग्य मंत्रालयाची माहिती
Follow us on

नवी दिल्ली : कोरोना विषाणू विरुद्धच्या लढाईत भारताला मोठे यश मिळाले आहे. भारतील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 90 टक्क्यांवर पोहोचला आहे. कोरोनामुक्त होण्याचा दर वाढत असतानाच कोरोना रुग्णांची संख्या देखील कमी होत आहे. गेल्या 24 तासात भारतात 50129 कोरोना रुग्ण आढळले आहेत त्याचवेळी 62077 जण कोरोनामुक्त झाले आहेत. (Corona Virus infected patient recovery rate reaches at 90 percentage in India)

भारतात सध्या 6 लाख 68 हजार कोरोना अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. भारतातील एकूण 70 लाख 78 हजार 123 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आरोग्य मंत्रालयाने ट्विट करुन देशातील सक्रिय रुग्ण आणि बरे झालेल्यांची संख्या वाढत असल्याची माहिती दिली. कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या देखील कमी होत आहे. जुलै ते सप्टेंबर महिन्यात देशातील 30 लाख लोकांनी कोरोनावर मात केली आहे.

केरळमध्ये रुग्णसंख्येत वाढ
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासात देशात सर्वाधिक रुग्णसंख्या केरळमध्ये आढळली आहे. 50129 कोरोना रुग्णसंख्येपैकी 79 टक्के रुग्ण देशातील 10 राज्यांमध्ये आढळली. महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्याचे दिसून आले तर केरळने महाराष्ट्राला देखील मागे टाकले आहे.

केरळमध्ये 8253, महाराष्ट्रात 6417, कर्नाटकमध्ये 4470 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. पश्चिम बंगालमध्ये 4148, दिल्ली 4116, आंध्र प्रदेश 3342, तामिळनाडू 2886, उत्तर प्रदेशमध्ये 2178, छत्तीसगडमध्ये 2011 आणि राजस्थानात 1852 कोरोना रुग्ण आढळले आहेत.

संबंधित बातम्या:

TOP 9 News | कोरोना संदर्भातील टॉप 9 न्यूज | 9 PM | 24 October 2020

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांना कोरोनाची लागण, संपर्कातील सर्वांनी काळजी घेण्याचं आवाहन

(Corona Virus infected patient recovery rate reaches at 90 percentage in India)