पुणे जिल्ह्याने कार्यशील नेतृत्व गमावलं, अजित पवारांची माजी आमदार सुरेश गोरेंना श्रद्धांजली

खेड-आळंदीचे माजी आमदार सुरेश गोरे यांचे निधन झाल्याचे समजून धक्का बसला. आज आम्ही आमचा जुना सहकारी, पुणे जिल्ह्याने एक कार्यशील नेतृत्वं गमावले आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली वाहिली.

पुणे जिल्ह्याने कार्यशील नेतृत्व गमावलं, अजित पवारांची माजी आमदार सुरेश गोरेंना श्रद्धांजली
| Updated on: Oct 10, 2020 | 9:00 PM

पुणे : “पुण्याच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रातील सहकारी, खेड-आळंदीचे माजी आमदार सुरेश गोरे यांचे निधन झाल्याचे समजून धक्का बसला. आज आम्ही आमचा जुना सहकारी, पुणे जिल्ह्याने एक कार्यशील नेतृत्वं गमावले आहे”, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली वाहिली. (DCM Ajit Pawar Tribute Shivsena Suresh Gore)

शिवसेनेत असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसशी ते प्रदीर्घ काळ निगडीत होते. राष्ट्रवादीशी त्यांचं वेगळे नाते होते. पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व प्रदीर्घ काळ सदस्य म्हणून काम केलेल्या सुरेश गोरे यांच्याबद्दलच्या अनेक आठवणी आहेत. गोरे कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो ही प्रार्थना, असे उपमुख्यमंत्री यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

आज शुक्रवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास पुण्यातल्या रुबी हॉस्पिटलमध्ये सुरेश गोरे यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. आज सकाळी त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.

सुरेश गोरे 2014 ला आमदार झाले होते. त्याअगोदर त्यांनी राष्ट्रवादीकडून सलग तीनवेळा जिल्हा परिषदेची निवडणूक लढवून ते विजयी झाले होते. जिल्हा परिषदेतलं त्यांचं काम वाखण्याजोगं होतं. पुणे जिल्हा परिषदेचं उपाध्यक्षपद देखील त्यांनी भूषवलं होतं.

खेड तालुक्यातले गोरे शिवसेनेचे पहिले आमदार राहिले होते. त्यांच्या निधनाने खेड तालुका शोकसागरात बुडाला आहे. त्यांच्या निधनाने पुणे जिल्हा शिवसेनेत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. (DCM Ajit Pawar Tribute Shivsena Suresh Gore)

संबंधित बातम्या

अजित पवारांची कथित ऑडिओ क्लिप, कल्याणराव काळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा शेतकऱ्याला सल्ला

दिवाळीनंतर शाळा सुरू करणार का?; अजित पवार म्हणतात…