घरामध्येच किंवा आहात त्याठिकाणीच राहा, थोडा त्रास सहन करा, फडणवीसांचं जनतेला आवाहन

| Updated on: Mar 23, 2020 | 3:58 PM

कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला काही दिवस घरीच राहण्याचा सल्ला दिला आहे (Devendra Fadnavis appeal people).

घरामध्येच किंवा आहात त्याठिकाणीच राहा, थोडा त्रास सहन करा, फडणवीसांचं जनतेला आवाहन
Follow us on

मुंबई : कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला काही दिवस घरीच राहण्याचा सल्ला दिला आहे (Devendra Fadnavis appeal people). देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर व्हिडीओ शेअर करत लोकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे (Devendra Fadnavis appeal people).

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन केलं होतं. मोदींच्या या आवाहनाला देशभरातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी जनतेचे आभार मानले. याशिवाय फक्त एक दिवस जनता कर्फ्यू पाळून चालणार नाही. कोरोना विषाणूंचं संक्रमण रोखायची असेल तर त्याची साखळी तोडावी लागेल, असं फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत काल उभ्या महाराष्ट्राने जनता कर्फ्यूला पाठिंबा दिला. त्यामुळे आपल्या सर्वांचं धन्यवाद. मात्र, मुंबई, पुणे, ठाणे, नागपूरमध्ये पुन्हा एकदा लोक रस्त्यावर दिसत आहेत. फक्त जनत कर्फ्यू पाळून चालणार नाही. संक्रमण रोखायची असेल तर त्याची साखळी तोडावी लागेल. याकरता आपल्या सगळ्यांना काही दिवस घरी राहावं लागेल”, असं फडणवीस म्हणाले.

“मला कल्पना आहे आपल्या सगळ्यांची धडपड ही जगण्याची आहे. पण आपण संक्रमित झालो तर या धडपडीचा उपयोग काय? आपल्यामुळे हे संक्रमण आपल्या परिवारात गेलं किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये गेलं तर या धडपडीचा उपयोग काय? त्यामुळे कृपया घरामध्येच राहा. आपण ज्याठिकाणी आहात त्याचठिकाणी राहा. थोडा त्रास सहन करा, पण एकदा ही साखळी तोडा. कोरोना विषाणूंची साखळी तोडायची असेल तर आपल्याला सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद द्यावं लागेल आणि एकत्रितपणे ही लढाई लढावी लागेल”, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

Corona Virus India | देशात कोरोनाबाधितांचा आकडा 400 पार, महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण

Corona | राज-उद्धव यांचं फोनवरुन बोलणं, मुख्यमंत्र्यांना राज ठाकरे यांची एक सूचना