
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि तिचे फोटो शेअर करून चाहत्यांचं मनोरंजन करत असते.

देवोलीनाला छोट्या पडद्यावर सुसंस्कृत सून म्हटलं जातं, मात्र वास्तविक जीवनात ती कधीही बोल्डनेसचा तडका जोडण्यास मागे हटली नाही.

अशा परिस्थितीत, नुकतंच तिनं तिच्या यलो बिकिनीचे काही फोटो चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्रीचा ग्लॅमरस लूक पाहायला मिळत आहे.

या सर्व फोटोंमध्ये ती वेगवेगळ्या स्टाईलमध्ये पोज देताना दिसत आहे, म्हणूनच तिचे हे फोटो खूप व्हायरल झाले आहेत.

देवोलीनाला साथ निभाना साथिया या शोमधून एक विशेष ओळख मिळाली, याशिवाय, तिने बिग बॉसमध्येही धमाल केली आहे.