AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी

धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी

| Updated on: Aug 17, 2026 | 11:27 PM
Share

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींच्या वर्तनासह बीड कारागृहातील कथित गैरप्रकारांबाबत धनंजय देशमुख यांनी कारागृह महानिरीक्षकांना पत्र लिहिलं आहे. कारागृहातील कर्मचाऱ्यांच्या नावांसह संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. संतोष देशमुख प्रकरणातील आरोपींचं कारागृहातील वर्तन योग्य नसल्याचा आरोप धनंजय देशमुख यांनी केला आहे. या आरोपींना बीड कारागृहातून नागपूर किंवा चंद्रपूर येथे […]

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींच्या वर्तनासह बीड कारागृहातील कथित गैरप्रकारांबाबत धनंजय देशमुख यांनी कारागृह महानिरीक्षकांना पत्र लिहिलं आहे. कारागृहातील कर्मचाऱ्यांच्या नावांसह संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

संतोष देशमुख प्रकरणातील आरोपींचं कारागृहातील वर्तन योग्य नसल्याचा आरोप धनंजय देशमुख यांनी केला आहे. या आरोपींना बीड कारागृहातून नागपूर किंवा चंद्रपूर येथे हलवण्याची मागणी यापूर्वीच करण्यात आली होती. आरोपींना दुसऱ्या कारागृहात हलवण्यास न्यायालयानेही आक्षेप नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आरोपींना तातडीने हलवून कारागृहातील गैरप्रकारांची चौकशी करावी, अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे.

Published on: Aug 17, 2026 11:27 PM

Follow Us