धुळे पोलिसांची मोठी कारवाई, बनावट नोटा बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

| Updated on: Oct 28, 2020 | 5:57 PM

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात बनावट नोटा छापणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने जेरबंद केले आहे.

धुळे पोलिसांची मोठी कारवाई, बनावट नोटा बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
Follow us on

धुळे : धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात बनावट नोटा छापणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने जेरबंद केले असून, त्यांच्याकडून दोनशे रुपयांच्या बनावट नोटा तसेच अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे. (Dhule police take a Action against four Accussed in fake Currency racket)

बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा धुळे पोलिसांना सुगावा लागला होता. पोलिसांनी छापा मारत बनावट नोटा छापणाऱ्या टोळीला गजाआड केलं आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे संपूर्ण धुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

शिरपूर तालुक्यातील कळमसरे येथे बनावट नोटांचा कारखाना सुरू असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने संतोष गुलाब बेलदार राहणार कळमसरे यांच्या घरावर छापा टाकला.

पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात त्यांना बनावट नोटा तयार करणारी यंत्रसामुग्री, त्याचबरोबर बनावट नोटा, संगणक, मोबाईल, बँकेचे पासबुक असा 48 हजार 307 रुपयांचा ऐवज आढळून आला. पोलिसांनी हा सगळा मुद्देमाल जप्त केला आहे.

धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिरपूर पोलिसांच्या मदतीने हा बनावट नोटांचा छापखाना उध्वस्त केला. बनावट नोटा बनवणाऱ्या ठिकाणी छापा टाकून पोलिसांनी आरोपींना रंगेहात अटक केली आहे. यात चौघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी पत्रकार परिषदेत दिली.

(Dhule police take a Action against four Accussed in fake Currency racket)

संबंधित बातम्या

Pune Crime | पुणे बनावट नोटांप्रकरणी 6 आरोपींना 15 जूनपर्यंत पोलीस कोठडी

पुण्यात बनावट नोटांच्या रॅकेटचा भांडाफोड, 47 कोटी 60 लाखांच्या बनावट नोटा जप्त