Dmart : आठवड्यातील कोणत्या दिवशी डी-मार्टमध्ये सर्वात स्वस्त सामान मिळतं? एक ट्रीक जाणून घ्या आणि नंतरच शॉपिंगला जा
डिर्माटमध्ये वस्तू स्वस्त मिळतात म्हणून लोकांची तुफान गर्दी असते. डीमार्टच्या वस्तू बाहेरच्या तुलनेत स्वस्त मिळतातच पण अनेक ऑफर पण असतात. आता या ऑफर कधी असतात ते जाणून घ्या...

डीमार्ट हा सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय ग्राहकांचा आवडता पर्याय मानला जातो. किराणा, कपडे आणि घरगुती वस्तू येथे MRP पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध असल्याने येथे खरेदी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र अधिक बचत करायची असल्यास कोणत्या दिवशी खरेदी फायदेशीर ठरेल, हे समजून घेणे महत्त्वाचे ठरते.

शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी स्टोअरमध्ये मोठी गर्दी असते आणि त्यावेळी विविध उत्पादनांवर विशेष ऑफर्स आणल्या जातात. किराणा, कपडे, स्किनकेअर, घरगुती वस्तू यावर या दिवसांत चांगल्या सवलती मिळतात. दिवाळी, दसरा, होळी, ख्रिसमस, नवीन वर्ष असे प्रमुख सण जवळ आल्यावर Buy One Get One सारख्या आकर्षक ऑफर अधिक प्रमाणात लागू होतात.

काही डीमार्ट स्टोअर्समध्ये रविवारीनंतर उरलेल्या स्टॉकची जलद विक्री करण्यासाठी क्लिअरन्स सेलही लावला जातो. या सेलमध्ये निवडक वस्तूंवर अतिरिक्त सवलत दिली जाते, जर तुम्ही D-Mart Ready ॲपद्वारे ऑनलाईन खरेदी करत असाल, तर सोमवार किंवा बुधवार या दिवशी खास ऑनलाइन डील्स आणि कूपन्स उपलब्ध होऊ शकतात.

शुक्रवारपासूनच नवीन सेल सुरू होतो. बोर्डवर 'Weekend Special' असे बोर्ड दिसतील. किराणामाल, तेल, डाळी, साबण या दिवशी स्टॉक भरपूर असतो, गर्दी कमी असते. पहिल्या दिवशी खरेदी केली तर आवडीचे ब्रँड मिळण्याची शक्यता जास्त असते.

शनिवार हा डीमार्टचा पीक डे आहे. सकाळी 9 ते रात्री 10 पर्यंत मोठी गर्दी होत असते. पण याच दिवशी बाय 1 गेट 1 , 50% ऑफ आणि कॉम्बो पॅक जास्त असतात. रविवार हा क्लोजिंग डे असतो. जे स्टॉक उरलेले असते, त्यावर एक्स्ट्रा 10-20% सूट मिळते. भाज्या, फळे, दूध पावडर अशा काही गोष्टी स्वस्त असतात.