दहशतवाद्यांचं औरंगाबाद कनेक्शन, डॉक्टर ताब्यात

| Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM

औरंगाबाद : दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन औरंगाबादमधील एका डॉक्टरला औरंगाबाद पोलिसांनी ताब्यात घेतले होते. काल (5 मार्च) दिवसभर चौकशी करुन, रात्री उशिरा या डॉक्टरला सोडून देण्यात आले. मात्र, आवश्यकता पडल्यास डॉक्टरला पुन्हा चौकशीसाठी ताब्यात घेतले जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. याआधीही मुंबईतील मुंब्रा आणि औरंगाबादमधून आयसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरुन तब्बल 9 जणांना […]

दहशतवाद्यांचं औरंगाबाद कनेक्शन, डॉक्टर ताब्यात
Follow us on

औरंगाबाद : दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन औरंगाबादमधील एका डॉक्टरला औरंगाबाद पोलिसांनी ताब्यात घेतले होते. काल (5 मार्च) दिवसभर चौकशी करुन, रात्री उशिरा या डॉक्टरला सोडून देण्यात आले. मात्र, आवश्यकता पडल्यास डॉक्टरला पुन्हा चौकशीसाठी ताब्यात घेतले जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

याआधीही मुंबईतील मुंब्रा आणि औरंगाबादमधून आयसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरुन तब्बल 9 जणांना ताब्यात घेण्यात आले होते. या 9 जणांशीच औरंगाबादमधील डॉक्टर संपर्कात होता, असा संशय पोलिसांना आला आणि त्यांनी काल ताब्यात घेतले. दिवसभ या डॉक्टरची चौकशी करण्यात आली आणि रात्री उशिरा सोडून देण्यात आले.

महाराष्ट्रातील काही भागातून आयसिसशी संबंधित काही जणांना याआधीही एटीएसने ताब्यात घेतले होते. त्यामुळे आयसिस या क्रूर दहशतवादी संघटनेचा महाराष्ट्र कनेक्शन उघड झाल आहे. सोशल मीडिया किंवा इतर माध्यमातून आयसिस या तरुणांची माथी भडकावून, त्यांना आपल्या जाळ्यात उतरवत असते, असे अनेकदा स्पष्ट झाले आहे.

आयसिस ही अत्यंत क्रूर आणि अमानवी कृत्य करणारी दहशतवादी संघटना असून, मध्य आशिया किंवा जगातील इतरत्रही अनेक दहशतवादी कारवायांमध्ये आयसिसने सक्रीय सहभाग नोंदवला आहे. त्यामुळे आयसिससारख्या क्रूर दहशतवादी संघटनेचा महाराष्ट्र कनेक्शन असणं, सुरक्षेच्या दृष्टीने खळबळजन मानले जाते.

दरम्यान, 14 फेब्रुवारी पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने सीआरपीएफच्या गाडीचा स्फोट घडवला. यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. या दहशतवादी घटनेनंतर देशभर सतर्कतेचा इशारा देण्यात आला. या सर्व काहीशा तणावाच्या स्थितीत औरंगाबादमध्ये आयसिसशी संबंधित डॉक्टरला ताब्यात घेतल्याने, सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत आणि चिंताही व्यक्त केली जात आहे.