अमेरिकेतील परदेशी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ निर्णय अखेर मागे

| Updated on: Jul 15, 2020 | 1:06 PM

ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांना पुन्हा मायदेशी पाठवण्याचा निर्णय अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मागे घेतला.

अमेरिकेतील परदेशी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, डोनाल्ड ट्रम्प यांचा तो निर्णय अखेर मागे
Follow us on

न्यूयॉर्क : अमेरिकेत शिक्षण घेत असलेल्या परदेशी विद्यार्थ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांना पुन्हा मायदेशी पाठवण्याचा निर्णय अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मागे घेतला. विद्यापीठ आणि परदेशी विद्यार्थ्यांच्या दबावासमोर ट्रम्प सरकार झुकल्याचे दिसत आहे. (Donald Trump administration rescinded rule that would have forced international students to leave the country)

अमेरिकन प्रशासनाने सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांना लवकरात लवकर सर्व अभ्यासक्रम ऑनलाईन सुरु करण्यास 6 जुलै रोजी सांगितले होते. जे परदेशी विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत आहेत, त्यांना अमेरिकेत राहण्याची गरज नाही, असे ट्रम्प यांनी सांगितले होते. या विद्यार्थ्यांचा व्हिसा रद्द करण्याचे आदेश दिल्यानंतर ट्रम्प यांच्यावर टीकेची झोड उठली.

हेही वाचा : धुमकेतूवरील सोने लुटीसाठी अमेरिका-चीनमध्ये धुमश्चक्री, सोन्याची किंमत चक्रावून सोडणारी

ट्रम्प सरकारच्या निर्णयाविरोधात जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी, हार्वर्ड, एमआयटी या विद्यापीठांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र मंगळवारी ट्रम्प प्रशासनातील इमिग्रेशन आणि कस्टम विभागाने न्यायालयात हा निर्णय मागे घेण्याची तयारी दर्शवली. ट्रम्प सरकारच्या यूटर्नमुळे अमेरिकेत राहणाऱ्या लाखो परदेशी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

ट्रम्प सरकारने विद्यापीठांवर ऑनलाईन अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी दबाव आणत विद्यार्थ्यांना आपापल्या देशात परतण्याचे आदेश दिले होते. या निर्णयाचा फटका अमेरिकेत शिकणाऱ्या जवळपास 10 लाख विद्यार्थ्यांना बसला असता. सध्या 2 लाखाहून अधिक भारतीय विद्यार्थी यूएसमध्ये शिकत आहेत. (Donald Trump administration rescinded rule that would have forced international students to leave the country)