AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kung Flu | ‘कोरोना’ म्हणजे ‘कुंग फ्लू’, निवडणूक प्रचाराच्या पहिल्याच रॅलीत ट्रम्प यांचे चीनवर शरसंधान

चीनी मार्शल आर्ट प्रकार 'कुंग फु'वरुन श्लेष साधत डोनाल्ड ट्रम्प यांनी 'कोरोना'ला 'कुंग फ्लू' असे संबोधले. (Donald Trump coronavirus kung flu)

Kung Flu | 'कोरोना' म्हणजे 'कुंग फ्लू', निवडणूक प्रचाराच्या पहिल्याच रॅलीत ट्रम्प यांचे चीनवर शरसंधान
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Jun 22, 2020 | 8:34 AM
Share

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला बालेकिल्ला ओकलाहोमातून अध्यक्षीय निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ वाढवला. पहिल्याच प्रचार रॅलीमध्ये ट्रम्प यांनी चीनला निवडणुकांचा मुद्दा म्हणून उचलून धरले. ‘कोरोना’ला 19 नावे दिली जाऊ शकतात, आपण त्याला ‘कुंग फ्लू’ म्हणू शकतो, अशा शब्दात ट्रम्प यांनी चीनवर शरसंधान साधले. (Donald Trump refers to coronavirus as kung flu during Tulsa rally)

ट्रम्प यांनी याआधीही ‘वूहान व्हायरस’, ‘चायनीज व्हायरस’ अशा शब्दात वंशभेदी टिपण्णी केली होती. आता चीनी मार्शल आर्ट प्रकार ‘कुंग फु’वरुन श्लेष साधत ‘कोरोना’ला ‘कुंग फ्लू’ असे संबोधले.

ट्रम्प यांनी प्रतिस्पर्धी ‘डेमोक्रेटिक पक्षा’चे उमेदवार जो बिडेन यांच्यावरही निशाणा साधला. “बिडेन हे कट्टरपंथी डाव्या विचारसरणीच्या नेत्यांच्या हातातील असहाय्य बाहुली आहेत. आम्हाला रोखण्यासाठी ते प्रत्येक दिवशी हिंसाचार आणि लूटपाट करत आहेत. दंगेखोरांना रसद पुरवत आहेत. स्मारके, प्रतिमा यांची नासधूस करुन आपला इतिहास नष्ट करु पाहत आहेत. त्यांच्या मागण्यांशी असहमत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला ते शिक्षा ठोठावू पाहत आहेत” असा आरोप ट्रम्प यांनी केला.

हेही वाचा : मी नरेंद्र मोदींशी बोललो, चीनप्रश्नी ते चांगल्या मूडमध्ये नाहीत : डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प यांनी ओकलाहोमातील टुलसा शहरात असलेल्या स्टेडियममध्ये जवळपास 100 मिनिटे भाषण केले. स्टेडियममध्ये बहुतांश व्यक्तींनी मास्क घातला नसल्याची माहिती आहे. त्यांनी सोशल डिस्टन्सिंगलाही हरताळ फासला. पोलिसांनी केवळ स्टेडियममध्ये प्रवेशापूर्वी त्यांचे तापमान तपासल्याचे बोलले जाते. (Donald Trump refers to coronavirus as kung flu during Tulsa rally)

रॅलीआधी ट्रम्प यांच्या प्रचारातील 6 जण ‘कोरोना’ पॉझिटिव्ह सापडले. रॅलीमध्ये एक जण बेशुद्ध पडल्याने ट्रम्प यांनी भाषण थांबवून डॉक्टरांना बोलावले.

(Donald Trump refers to coronavirus as kung flu during Tulsa rally)

Follow Us
मोठी बातमी! विश्वासू नेत्यासह सर्व समर्थकांचा शिंदे गटात पक्ष प्रवेश;
मोठी बातमी! ठाकरेंच्या विश्वासू नेत्यासह सर्व समर्थकांचा शिंदे गटात पक्ष प्रवेश; कणकवलीत नितेश राणेंचा धक्का
ठाकरे गटाला मोठा धक्का! महिला नेत्याचं जात प्रमाणपत्र अचानक रद्द
ठाकरे गटाला मोठा धक्का! महिला नेत्याचं जात प्रमाणपत्र अचानक  रद्द, पदावर टांगती तलवार
धारशिवमधील आश्रम शाळेची दुरावस्था समोर, ओमराजेंनी दिली भेट
Omraje Nimbalkar : धारशिवमधील आश्रम शाळेची दुरावस्था समोर, ओमराजेंनी दिली भेट
सुषमा अंधारे यांचा चित्रा वाघ यांना टोला
सुषमा अंधारे यांचा चित्रा वाघ यांना टोला: कार्यकाळ संपतोय म्हणून उसने अवसान?
महाराष्ट्र आणि जर्मनीच्या हेसन राज्यात ऐतिहासिक सामंजस्य करार
महाराष्ट्र आणि जर्मनीच्या हेसन राज्यात ऐतिहासिक सामंजस्य करार: गुंतवणूक आणि कौशल्य विकासाला बळ
स्टेटस रेस्टॉरंट, बॉम्बे रेडिओ क्लबसह 7 आस्थापनांचे परवाने निलंबित
मुंबई एफडीएची मोठी कारवाई; स्टेटस रेस्टॉरंट, बॉम्बे रेडिओ क्लबसह 7 आस्थापनांचे परवाने निलंबित
झेप्टोच्या बेकायदेशीर वाहनांवर कारवाई करा, युवासेनेचा इशारा
मीरा-भाईंदरमध्ये झेप्टोच्या बेकायदेशीर वाहनांवर, अल्पवयीन चालकांवर कारवाईची युवासेनेची मागणी
अंतर्गत लोकशाही पक्षफुटीला प्रतिबंध करते- राहुल नार्वेकर
राहुल नार्वेकर: नेत्यांच्या भावना समजल्यास आणि अंतर्गत लोकशाहीमुळे पक्ष फुटणार नाहीत.
पुण्यात भाजप-राष्ट्रवादी संघर्ष तीव्र
Pune : पुण्यात भाजप-राष्ट्रवादी वाद चिघळला: चंद्रकांत पाटलांच्या विकासकामांच्या ऑडिटची मागणी नगरसेवकांना भोवली?
पॅलेट गन पीडिताच्या एका महिन्याच्या संघर्षानंतर अखेर FIR दाखल
Delhi : राहुल गांधींच्या मागणीनंतर पॅलेट गन प्रकरणी अखेर FIR दाखल