AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dharashiv Crop Insurance Case: धाराशिवमधील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, पीकविम्याची लढाई जिंकली, सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल

विमा कंपनान्यांनी नाकारलेले 227 कोटी रुपये देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.  2020 सालच्या अवकाळी पावसानंतर विमा कंपन्यांनी वेगवेगळी कारण सांगत पैसे देण्यास विमा कंपनीने नकार दिला होता,  मात्र आता पुढच्या 15 दिवसांच्या आत हे 227 कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी देण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत.

Dharashiv Crop Insurance Case: धाराशिवमधील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, पीकविम्याची लढाई जिंकली, सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल
| Updated on: Nov 20, 2026 | 4:44 PM
Share

प्रमोद जगताप, प्रतिनिधी: धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. विमा कंपनान्यांनी नाकारलेले 227 कोटी रुपये देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.  2020 सालच्या अवकाळी पावसानंतर विमा कंपन्यांनी वेगवेगळी कारण सांगत पैसे देण्यास विमा कंपनीने नकार दिला होता,  मात्र आता पुढच्या 15 दिवसांच्या आत हे 227 कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी देण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत. या निकालामुळे धाराशिव जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

धाराशिवमधील शेतकऱ्यांना मोठा दिलासा, २२७ कोटींची लॉटरी! 

याबाबत बोलताना भारतीय जनता पक्षाचे आमदार राणाजगजिसिंह पाटील यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. “कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर न्याय देवतेने पांडुरंगाच्या भक्तांना न्याय दिला आहे. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱयांना न्याय दिला आहे. पुढच्या दहा दिवसात धाराशिवच्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्य़ांना २२७ कोटी मिळणार आहे. प्रति हेक्टरी 7 हजार रुपये मिळणार आहे. मा. न्यायालयाने इतर शेतकऱ्यांनाही पैसे द्यायचे असे आदेश दिलेले आहेत, ” असं ते म्हणाले.

तसेच “मदतीचे निकष सरकारने बदलले आहेत. अजुनही काही फ्लॉज आहेत. क्रॉप कटींग एक्सपरिंमेंट हे गोल्डन आहे. त्यात अजुनही काही त्रुटी आहेत. आजच्या निकालामध्ये पैशे देण्यास जी टाळाटाळ होत होती त्यावर न्यायालयाने आज निकाल दिला,” असं म्हणत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी या निर्णयावर समाधान व्यक्त केले आहे.

दरम्यान, “आज सर्वोच्च न्यायालयाने धाराशिव जिल्ह्यासाठी ऐतिहासिक निर्णय दिला. 2021 मध्ये केस दाखल केली होती. 2020 साली शेतकऱ्यांनी 72 तासात पोर्टवलर नोंद केली नव्हती म्हणून पीक विमा नाकारला होता. मी केस दाखल केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आज त्याचा निकाल दिला आणि शेतकऱ्यांना न्याय दिला,” असं म्हणत माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनीही या निर्णयावरुन समाधान व्यक्त केले आहे.

Follow Us
सैराटमधील आर्ची-परश्याच्या गाजलेल्या विहिरीने गाठला तळ; 50 फुटांची....
Solapur : सैराटमधील आर्ची-परश्याच्या गाजलेल्या विहिरीने गाठला तळ; 50 फुटांची विहीर कोरडीठाक सोलापुरातील दुष्काळाचं भीषण वास्तव समोर
व्यापाऱ्यांच्या इशाऱ्यानंतर लक्ष्मी रस्त्यावरील अतिक्रमण कारवाई थांबली
Pune Laxmi Road : व्यापाऱ्यांच्या इशाऱ्यानंतर लक्ष्मी रस्त्यावरील अतिक्रमण कारवाई थांबली; पुणे बंदचा इशारा ठरला प्रभावी
सूचना देऊनही निर्णय वेगळा घेतला; शिवेंद्रराजे भोसले नेमकं काय म्हणाले?
Shivendraraje Bhosale : सातारा जिल्हा बँकेच्या निवडीवरून महायुतीत मतभेद? सूचना देऊनही निर्णय वेगळा घेतला; शिवेंद्रराजे भोसले नेमकं काय म्हणाले?
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटाचा वाद कोर्टात; प्रदर्शनही पुढे ढकलल
Maharashtra Epstein Files : महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटाचा वाद कोर्टात; प्रदर्शनही पुढे ढकललं
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीत नाराजी? बावनकुळेंनी....
Chandrashekhar Bawankule : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीत नाराजी? चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले?
प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवरील कारवाई थांबली; एकनाथ शिंदेंच्या....
Prabhadevi : प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवरील कारवाई थांबली; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मध्यस्थीनंतर रेल्वे प्रशासनाचा निर्णय
मोठी बातमी! प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवर रेल्वेची कारवाई, 100...
मोठी बातमी! प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवर रेल्वेची कारवाई, 100 कुटुंबे बेघर होण्याच्या भीतीने रस्त्यावर!
ओडिशाच्या किनारपट्टीवर अम्फान चक्रीवादळाचा तडाखा; 3 लाखांहून अधिक...
ओडिशाच्या किनारपट्टीवर अम्फान चक्रीवादळाचा तडाखा; 3 लाखांहून अधिक नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर!
शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, सरकार स्थिर..
शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, सरकार स्थिर राहणार असे...
लोणावळ्यातील 4 नामांकित हॉटेल्सवर FDAची मोठी कारवाई; थेट परवाने...
Pune FDA : पुण्यातील 4 नामांकित हॉटेल्सवर FDAची धाड; थेट केली कारवाई...