AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताला टेन्शन देणारी बातमी, 9 जहाजांना धोका, थेट सरकारने..

इराण आणि अमेरिका यांच्या तणावात होर्मुज खाडी युद्धाचे मैदान बनली. होर्मुज खाडीत तणाव आहे. त्यातच आता भारताशी संबंधित काही जहाजांवर होर्मुज खाडीत हल्ला करण्यात आला. ज्या जहाजावर हल्ला करण्यात आला, त्या जहाजात 24 भारतीय कर्मचारी उपस्थित होते.

भारताला टेन्शन देणारी बातमी, 9 जहाजांना धोका, थेट सरकारने..
Strait of Hormuz
| Updated on: Nov 20, 2026 | 4:44 PM
Share

होर्मुज खाडीत तणाव वाढला आहे. 24 भारतीय नागरिक असलेल्या जहाजावर मोठा हल्ला होर्मुज खाडीजवळ झाला. त्यानंतर भारत सरकारने निषेध व्यक्त करत आपली भूमिका स्पष्ट केली. अनेक जहाजांना होर्मुज खाडीत टार्गेट केले जात आहे. इराण आणि अमेरिका युद्धात होर्मुज खाडी युद्धाचे मैदान बनली आहे. जहाजांवर क्षेपणास्त्र हल्ले केली जात आहेत. त्यातच आता भारतीय ध्वज असलेले आणि भारताशी संबंधित 9 जहाजांवर विशेष नजर ठेवली जात आहे. केंद्रीय मंत्र्यांनी समुद्री सुरक्षा मजबूत केल्याबद्दल भाष्य केले. सोनोवाल यांनी मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. ज्यात भारतीय जहाजे आणि खलाशी यांच्या सुरक्षेबद्दल योग्य ती पाऊले उचलण्यावर भाष्य करण्यात आले. त्यांनी समुद्रातील सुरक्षा आणि संवेदनशिल भागाची निगरानी करण्यावर भाष्य केले. सुरक्षेसंदर्भात वारंवार माहिती देण्याचेही निर्देश दिली आहेत. 9 जहाजांवरील धोका लक्षात घेऊन सुरक्षा अधिक मजबूत करण्यात आली.

मंत्रालयाने सांगितलेल्या माहितीनुसार, सोनोवाल यांनी सुरक्षेसंदर्भात व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी पाऊले उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत. संवेदशिल भागात अधिक नजर ठेवली जाईल. सुरक्षा संबंधित इशारा आणि सूचना जहाजापर्यंत कशी लवकर पोहोचवता येईल, याकरिता प्रयत्न केली जातील. शिपिंग कंपनी आणि जहाजांच्या मालकासोबत अधिक संपर्कात राहिले जाईल.

भारतीय खलाशांची सुरक्षा आणि बचावकार्य यावरही भर दिला जाईल. व्यापारी जहाजांवर होत असलेल्या हल्ल्याविरोधात भारताने भूमिका घेतली असून यावर टीका केली. भारतीय कर्मचारी असलेल्या जहाजांना निशाणा बनवत असल्याने भारताने चिंता व्यक्त केली आहे. भारताने आता उपायोजना करण्यासही सुरूवात केली.

केंद्रीय मंत्र्यांनी म्हटले की, अधिकाऱ्यांना विदेश मंत्रालय, भारतीय दूतावास आणि समुद्र क्षेत्राशी संबंध व्यक्तींच्या संपर्कात राहण्यास सांगितले. यासोबतच जागतिक एजन्सींच्या संपर्कात राहण्याच्याही सूचना दिल्या आहेत. होर्मुज खाडीतून इराण आणि अमेरिका युद्धाच्या तणावात 86 जहाजे गेली आहेत. भारतीय जहाजांना सुरक्षित मार्ग इराणकडून दिला जात आहे. पण मागील काही दिवसांपासून हल्ले वाढली आहेत. भारतात कच्चे तेल आणि एलपीजीचा पुरवठा होर्मुज खाडीतून होतो.

Follow Us
सैराटमधील आर्ची-परश्याच्या गाजलेल्या विहिरीने गाठला तळ; 50 फुटांची....
Solapur : सैराटमधील आर्ची-परश्याच्या गाजलेल्या विहिरीने गाठला तळ; 50 फुटांची विहीर कोरडीठाक सोलापुरातील दुष्काळाचं भीषण वास्तव समोर
व्यापाऱ्यांच्या इशाऱ्यानंतर लक्ष्मी रस्त्यावरील अतिक्रमण कारवाई थांबली
Pune Laxmi Road : व्यापाऱ्यांच्या इशाऱ्यानंतर लक्ष्मी रस्त्यावरील अतिक्रमण कारवाई थांबली; पुणे बंदचा इशारा ठरला प्रभावी
सूचना देऊनही निर्णय वेगळा घेतला; शिवेंद्रराजे भोसले नेमकं काय म्हणाले?
Shivendraraje Bhosale : सातारा जिल्हा बँकेच्या निवडीवरून महायुतीत मतभेद? सूचना देऊनही निर्णय वेगळा घेतला; शिवेंद्रराजे भोसले नेमकं काय म्हणाले?
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटाचा वाद कोर्टात; प्रदर्शनही पुढे ढकलल
Maharashtra Epstein Files : महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटाचा वाद कोर्टात; प्रदर्शनही पुढे ढकललं
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीत नाराजी? बावनकुळेंनी....
Chandrashekhar Bawankule : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीत नाराजी? चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले?
प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवरील कारवाई थांबली; एकनाथ शिंदेंच्या....
Prabhadevi : प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवरील कारवाई थांबली; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मध्यस्थीनंतर रेल्वे प्रशासनाचा निर्णय
मोठी बातमी! प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवर रेल्वेची कारवाई, 100...
मोठी बातमी! प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवर रेल्वेची कारवाई, 100 कुटुंबे बेघर होण्याच्या भीतीने रस्त्यावर!
ओडिशाच्या किनारपट्टीवर अम्फान चक्रीवादळाचा तडाखा; 3 लाखांहून अधिक...
ओडिशाच्या किनारपट्टीवर अम्फान चक्रीवादळाचा तडाखा; 3 लाखांहून अधिक नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर!
शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, सरकार स्थिर..
शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, सरकार स्थिर राहणार असे...
लोणावळ्यातील 4 नामांकित हॉटेल्सवर FDAची मोठी कारवाई; थेट परवाने...
Pune FDA : पुण्यातील 4 नामांकित हॉटेल्सवर FDAची धाड; थेट केली कारवाई...