EXCLUSIVE पुलवामा हल्ल्यापूर्वीचा व्हिडीओ

| Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM

श्रीनगर: पुलवामामध्ये 14 फेब्रुवारी रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या काही क्षणापूर्वीचा एक EXCLUSIVE व्हिडीओ टीव्ही 9 ला मिळाला आहे. CRPF जवानांच्या ज्या बसला दहशतवाद्यानं आपलं निशाणा बनवला, त्या बसमध्ये असलेल्या एका जवानानं हल्ला होण्यापूर्वी काही क्षणापूर्वी तो व्हिडीओ आपल्या पत्नीला व्हॉटसअॅप केला होता. हा व्हिडीओ टीव्ही 9 मराठीला मिळाला आहे. बसमधून जात असताना सुखजिंदर सिंग यांनी […]

EXCLUSIVE पुलवामा हल्ल्यापूर्वीचा व्हिडीओ
Follow us on

श्रीनगर: पुलवामामध्ये 14 फेब्रुवारी रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या काही क्षणापूर्वीचा एक EXCLUSIVE व्हिडीओ टीव्ही 9 ला मिळाला आहे. CRPF जवानांच्या ज्या बसला दहशतवाद्यानं आपलं निशाणा बनवला, त्या बसमध्ये असलेल्या एका जवानानं हल्ला होण्यापूर्वी काही क्षणापूर्वी तो व्हिडीओ आपल्या पत्नीला व्हॉटसअॅप केला होता. हा व्हिडीओ टीव्ही 9 मराठीला मिळाला आहे.

बसमधून जात असताना सुखजिंदर सिंग यांनी हा व्हिडीओ चित्रीत केला आणि आपल्या पत्नीला पाठवला. हा व्हिडीओ चित्रित करणारे जवान सुखजिंदर पंजाबच्या तरनतारनचे रहिवासी होते. या व्हिडीओत त्यांनी बसमधील दृश्ये कैद केली, बाहेर बर्फ पडलेला आहे. संपूर्ण डोंगराळ भाग. थोडे पुढे गेलं की रस्ता दिसतो, तिथं बर्फ दिसत नाही.

बसमधून जात असताना सुखजिंदर सिंग यांनी हा व्हिडीओ चित्रीत केला आणि आपल्या पत्नीला पाठवला. परंतु दैवर्दुविलास असा की, त्यांच्या पत्नीनं हा व्हिडीओ पाहिलाच नाही, तो पाहण्यापूर्वीच बसवर दहशतवादी हल्ला झाला.  हा व्हिडिओ पाठवण्यापू्र्वी आपण सुट्टीला घरी येत असल्याचं त्यांनी पत्नीला फोनवरून सांगितलं होतं. पण त्यावर सरबजीतचा विश्वास बसला नाही, म्हणून सुखजिंदरनं हा व्हिडिओ शूट केला आणि व्हॉट्सअॅपवर तिला पाठवला. पण काही मिनिटात सुखजिंदर असलेल्या बसवर दहशतवादी हल्ला झाला. स्फोटात संपूर्ण बसच्या चिंधड्या उडाल्या.

हल्ल्याची बातमी ऐकताच सरबजीत बेशुद्ध पडली. सुखजिंदर सिंग असलेल्या बसवर दहशतवादी हल्ला झाला होता. बसमधील सर्व जवान शहीद झाले होते. काही मिनिटापूर्वीच सरबजीत आपल्या पतीशी बोलली होती. त्यामुळे आपला पती या जगात नाही, यावर तिचा विश्वास बसणं कठीण होतं.

हल्ल्याच्या बातमीनं संपूर्ण कुटुंब शोकसागरात लोटलं. नंतर यथाअवकाश त्यांनी व्हॉट्स अप पाहिलं तेव्हा त्यात सरबजीतसाठी पाठवलेला व्हिडीओ दिसला.  सुखजिंदर सिंगने हल्ला होण्यापूर्वी बसमधील दृश्यं आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केली, यात स्वतः सुखजिंदर सिंग दिसत आहेत. या व्हिडीओत ते अतिशय रिलॅक्स दिसत होते. मोबाईलचा कॅमेरा पॅन करून त्यांच्या आजूबाजूचे दृश्यं आणि वस्तू दाखवली. त्यांची बँगसारखी दृश्ये त्यांनी पत्नीला व्हॉटस अप केली. आणि काही क्षणातच धमाका झाला.

शोकसागरातून काहीसं बाहेर पडल्यानंतर सरबजीतनं आपला मोबाईल पाहिला, त्यात सुखजिंदरने पाठवेला व्हिडिओ पाहून तिला अश्रू अनावर झाले, सुखजिंदरच्या आई-वडिलांना हा व्हिडीओ पाहून रडू कोसळलं. टीव्ही 9 वर आम्ही हा व्हिडिओ तुम्हाला यासाठी दाखवत आहोत की, एका कुटुंबासाठी त्यांच्या प्राणप्रिय व्यक्तीचं जाणं काय असतं, हे तुम्हाला यातून उमगेल. रक्त गोठवणाऱ्या थंडीत, बर्फाळ प्रदेशात देशासाठी कर्तव्य बजावल्यानंतर काही काळ सुट्टी घेऊन आपल्या कुटुंबियाबरोबर चार दिवस घालवू आणि नंतर पुन्हा आपल्या ड्युटीवर येऊ, असे स्वप्न सुखजिंदरनं पाहिलं. परंतु, नंतर जे काही झालं ते अत्यंत वेदनादायी होतं. जवान आपल्या घरी गेलाच नाही, मात्र त्यांच्या घरी पोहचला हा धक्कादायक व्हिडीओ.

VIDEO: