नागपूरच्या साई मंदिरात आर्थिक अनियमितता, चौकशीच्या मागणीसाठी धर्मदाय आयुक्त कार्यालयाबाहेर बॅनर्स

| Updated on: Jun 30, 2020 | 5:54 PM

नागपूरच्या साई मंदिरात सोने-चांदी खरेदीत घोटाळा करण्यात आला (Sai Temple Scam Nagpur)आहे

नागपूरच्या साई मंदिरात आर्थिक अनियमितता, चौकशीच्या मागणीसाठी धर्मदाय आयुक्त कार्यालयाबाहेर बॅनर्स
Follow us on

नागपूर : नागपूरच्या साई मंदिरात सोने-चांदी खरेदीत घोटाळा करण्यात आला (Sai Temple Scam Nagpur)आहे, असा गंभीर आरोप साई मंदिर सेवा मंडळाचे सदस्य राजीव जयस्वाल यांनी केला आहे. या घोटाळ्याची चौकशी करा या मागणीसाठी धर्मदाय आयुक्त कार्यालयाबाहेर जयस्वाल यांनी बॅनर्स लावले (Sai Temple Scam Nagpur) आहेत.

धर्मदाय आयुक्तांनी दहा दिवसांत चौकशी करावी, अन्यथा धर्मदाय आयुक्त कार्यालयाबाहेर आमरण उपोषण करेल असा ईशाराही जयस्वाल यांनी दिला आहे.

धर्मदाय आयुक्त कार्यालयाबाहेर बॅनर्स साई सेवा मंडळाचे सदस्य राजीव जयस्वाल यांनी लावला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून साई सेवा मंडळाबाबत तक्रारी करत असून, त्यावर कारवाई झाली नाही, असा आरोपही राजीव जयस्वाल यांनी केला आहे.

“मागील चार वर्षात साई मंदिर वर्धा रोड या न्यासात गंभीर आर्थिक घोटाळे, आर्थिक अनियमितता, घटनाबाह्य कामे विश्वस्त मंडळाने न्यासात केले आहेत. या तक्रारी वारंवार आपल्याकडे, न्यास विभागाकडे करत आलो आहे. परंतु आजपर्यंत विभागाने आणि आपण याची काहीच दखल घेऊन माझे समाधान केलं नाही. 10 दिवसात याची दखल घेतली नाही तर मी न्यास कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार याची पूर्ण जबाबदारी ही सहधर्मादाय आयुक्त यांची राहील”, असं या बॅनरमध्ये म्हटलं आहे.

संबंधित बातम्या :

Breaking | नागपूरात पोलिसांची दोन महिन्यात 56 हजार वाहन चालकांना दणका

नागपूरसाठी दिलासादायक बातमी, मेयो-मेडिकलमध्ये 339 पैकी 309 कोरोना रुग्णांना एकही लक्षण नाही