महाराष्ट्राच्या माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचं निधन

| Updated on: Jul 16, 2020 | 9:18 AM

महाराष्ट्राच्या पहिल्या स्त्री निवडणूक आयुक्त म्हणून नीला सत्यनारायण परिचित होत्या.

महाराष्ट्राच्या माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचं निधन
Follow us on

मुंबई : महाराष्ट्राच्या माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचं निधन झालं. ‘कोरोना’चा संसर्ग झाल्याने त्यांच्यावर मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान पहाटे चार वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (First Woman State Election Commissioner of Maharashtra Neela Satyanarayanan Dies)

नीला सत्यनारायण 1972 च्या आयएएस बॅचच्या सनदी अधिकारी होत्या. महाराष्ट्राच्या पहिल्या स्त्री निवडणूक आयुक्त म्हणून नीला सत्यनारायण परिचित होत्या.

नीला सत्यनारायण यांनी 37 वर्षांच्या कारकिर्दीत गृह, वनविभाग, माहिती आणि प्रसिद्धी, वैद्यक आणि समाजकल्याण, ग्रामीण विकास यासारख्या अनेक खात्यांत सनदी अधिकारी म्हणून काम केलं

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर! 

सनदी अधिकारी म्हणून नीला सत्यनारायण यांची ओळख होतीच, मात्र साहित्य क्षेत्रातही त्यांची मुशाफिरी होती. संवेदनशील कवयित्री, स्तंभलेखिका म्हणून त्या लोकप्रिय झाल्या.

नीला सत्यनारायण यांनी हिंदी, मराठी, इंग्रजी या तिन्ही भाषांमधून पुस्तकं लिहिली. याशिवाय 150 हून अधिक कविता लिहिल्या. त्यांनी काही मराठी आणि हिंदी चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन केलं होतं. ‘कोरोना’ने आणखी एका प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वाचा बळी घेतल्याने हळहळ व्यक्त होत आहे. (Neela Satyanarayanan Dies)