बोईसरमध्ये पहिला कोरोना रुग्ण, काटेकोरपणे संचारबंदी, मुंबई-ठाण्याहून येणाऱ्या गाड्यांची विशेष तपासणी

| Updated on: Apr 28, 2020 | 8:52 AM

बोईसरमध्ये मुंबई प्रवास झालेल्या इसमाला कोरोनाची लागण झाली हे उघड झाल्यानंतर संपूर्ण बोईसरमध्ये लॉकडाऊन करण्यात आले (Corona patient boisar) आहे.

बोईसरमध्ये पहिला कोरोना रुग्ण, काटेकोरपणे संचारबंदी, मुंबई-ठाण्याहून येणाऱ्या गाड्यांची विशेष तपासणी
Follow us on

पालघर : बोईसरमध्ये मुंबई प्रवास झालेल्या इसमाला कोरोनाची लागण झाली हे उघड झाल्यानंतर संपूर्ण बोईसरमध्ये लॉकडाऊन करण्यात आले (Corona patient boisar) आहे. येथील प्रमुख रस्ते बंद करण्यात आले असून बोईसर भागात प्रवेश करण्यास मज्जाव केला जात आहे. महत्त्वाच्या रस्त्यांवर कडक पोलीस बंदोबस्त आहे. विशेष करुन मुंबई आणि ठाण्याहून येणाऱ्या गाड्यांची विशेष तपासणी केली जात (Corona patient boisar) आहे.

बोईसर दलाल टाँवर येथील एका 35 वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाल्याने रविवारी (26 एप्रिल) रात्रीपासूनच इसम राहत असलेल्या इमारतीमधील 10 लोकांना तपासणीसाठी ताब्यात घेतले होते. सोमवारी (27 एप्रिल) सकाळपासूनच बोईसर पोलिसांनी विभागातील प्रमुख रस्ते बंद केले.

येत्या 14 दिवसांसाठी बोईसर परिसर सिल करण्यात आला असून यातील बोईसर तारापूर मुख्य रस्त्यावर सिडको नाका रस्ता, चित्रालय पोलीस चौकी मुख्य रस्ता या दोन ठिकाणी मुख्य रस्ताच बंद करण्यात आला आहे. तसेच बोईसरमध्ये प्रवेश करण्यासाठी असलेली बेटेगाव येथील मुख्य चौकीवर वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.

मुंबई-ठाण्याहून कोणी आले आहे का याबाबत खबरदारी घेतली जात आहे. यातच बोईसर भाजी मार्केट आणि इतर दुकाने पाच दिवस बंद करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीकडून घेण्यात आला आहे. बोइसरमध्ये एक कोरोनाबाधित रुग्ण अढळल्याने पालघर ग्रामीणमध्ये कोरोनाबाधिताची संख्या 20 झाली आहे.

दरम्यान, राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. आतापर्यंत राज्यात 8590 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 369 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 1282 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

संबंधित बातम्या :

‘मी शपथ घेतो की..’, संचारबंदीचे नियम मोडणाऱ्यांसाठी पालघर पोलिसांकडून शपथ

जीवनावश्यक वस्तूंच्या नावाखाली गुटख्याची तस्करी, पालघरमध्ये 15 लाखांचा गुटखा जप्त