निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्याचा आरोप, मनसेच्या जिल्हा उपाध्यक्षाचा राजीनामा

मनसेचे बुलडाणा जिल्हा उपाध्यक्ष गणेश बरबडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. (Ganesh Barbade resign as Buldhana MNS District Vice President)

निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्याचा आरोप, मनसेच्या जिल्हा उपाध्यक्षाचा राजीनामा
Follow us
| Updated on: Sep 24, 2020 | 6:04 PM

बुलडाणा : मनसेचे बुलडाणा जिल्हा उपाध्यक्ष गणेश बरबडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्याचा आरोप करत त्यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिलाय. त्यामुळे बुलडाणा जिल्हा मनसेला मोठा धक्का बसला आहे. (Ganesh Barbade resign as Buldhana MNS District Vice President)

पक्षातील जुन्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता पक्षात नवीन आलेल्या लोकांना पदे दिल्याचा आरोप करत बरबडे यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला आहे. त्यांच्या राजीनाम्याने बुलडाणा मनसेमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

नुकतीच बुलडाणा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची नवीन कार्यकारिणी जाहीर झाली. या कार्यकारिणीमध्ये निष्ठावंत कार्यकर्ते आणि जुन्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता पक्षात नवीन आलेल्या लोकांना पदे दिल्याचा आरोप बरबडे यांनी केला आहे. मनसेच्या प्रभारी जिल्ह्याध्यक्षांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता पक्षात नव्याने आलेल्या लोकांना पदे दिल्याचा आरोप बरबडे यांनी केला आहे.

बुलडाणा जिल्हा मनसेच्या नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी जिल्हाउपाध्यक्ष गणेश बरबडे यांची भेट घेत आपली नाराजी व्यक्त केली. हेच कारण देत जिल्हा उपाध्यक्ष बरबडे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. बरबडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा मनसेचे राज्य उपाध्यक्ष आनंद एम्बडवार यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि इतर नेते यांच्याकडे पाठवला आहे. गणेश बरबडे यांच्या आरोपानंतर आणि तडकाफडकी राजीनाम्यानंतर बुलडाणा जिल्हा मनसेला मोठा धक्का बसला आहे.

कोण आहेत गणेश बरबडे?

शिवसेनेतून राज ठाकरे ज्यावेळी बाहेर पडले आणि त्यांनी मनसेची स्थापना केली तेव्हापासून गणेश बरबडे हे मनसेचे एकनिष्ट म्हणून राहिलेले आहेत. सुरुवातीला त्यांनी चिखली तालुका अध्यक्ष म्हणून काम केलं.  त्यावेळी प्रथमच त्यांनी चिखली पंचायत समितीमध्ये मनसेचा पंचायत समिती सदस्य निवडून आणला आणि जिल्ह्यात मनसेचे खाते उघडले

गणेश बरबडे यांनी स्वतः नगरपालिका निवडणूक देखील दोन वेळा लढली आहे. मनसेमध्ये एकनिष्ठ असल्याने पक्षाने मागील 5 वर्षापासून त्यांच्यावर जिल्ह्य उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती. ही जबाबदारी सांभाळत असताना जिल्हाभर त्यांनी असंख्य कार्यकर्ते जोडले. विविध आंदोलने तसंच गोरगरिबांची अनेक कामं त्यांनी केली. आपल्या आंदोलनामधून अनेक वंचित घटकांना त्यांनी न्याय मिळवून दिला.

संबंधित बातम्या-

MNS | आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातील स्थानिकांचा मनसेत प्रवेश करण्यासाठी कृष्णकुंजवर दाखल

(Ganesh Barbade resign as Buldhana MNS District Vice President)

Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.