Corona | अर्थव्यवस्थेला बसलेल्या फटक्यामुळे चिंताग्रस्त, जर्मनीत अर्थमंत्र्यांची आत्महत्या

| Updated on: Mar 30, 2020 | 8:21 AM

54 वर्षीय थॉमस शेफर शनिवारी रेल्वे रुळाजवळ मृतावस्थेत आढळले होते. 'कोरोना'चा अर्थव्यवस्थेला फटका बसल्याने चिंताग्रस्त होऊन त्यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज आहे (Germany minister Thomas Schaefer suicide)

Corona | अर्थव्यवस्थेला बसलेल्या फटक्यामुळे चिंताग्रस्त, जर्मनीत अर्थमंत्र्यांची आत्महत्या
Follow us on

फ्रँकफर्ट : जर्मनीत ‘कोरोना’मुळे हाहा:कार माजलेला असतानाच अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. हेस्सी प्रांताचे अर्थमंत्री थॉमस शेफर यांनी आत्महत्या केली. ‘कोरोना व्हायरस’मुळे अर्थव्यवस्थेला बसलेल्या फटक्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या शेफर यांनी टोकाचं पाऊल उचललं. (Germany minister Thomas Schaefer suicide)

54 वर्षीय थॉमस शेफर शनिवारी रेल्वे रुळाजवळ मृतावस्थेत आढळले होते. त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. हेस्सी प्रांताचे प्रमुख व्होकर बौफियर यांनी रविवारी या वृत्ताला दुजोरा दिला.

‘आम्हाला मोठा धक्का बसला आहे. ही घटना अविश्वसनीय आहे. थॉमस शेफर यांनी घेतलेला टोकाचा निर्णय चटका लावणारा आहे’ असं बुफियर यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे.

हेही वाचा : आधी राजघरण्यात शिरकाव, आता थेट पंतप्रधानांनाही कोरोनाची लागण, ब्रिटनचे पंतप्रधान कोरोनाग्रस्त

हेस्सी हे जर्मनीची आर्थिक राजधानी फ्रँकफर्टचे मुख्य केंद्र आहे. जेथे डच बँक आणि कॉमर्सबँक सारख्या प्रमुख बँकांचे मुख्यालय इथे आहे. युरोपियन सेंट्रल बँकही फ्रँकफर्ट येथे आहे.

गेल्या 10 वर्षांपासून हेस्सीचे अर्थमंत्रीपद थॉमस शेफर भूषवत होते. व्होकर बुफियरप्रमाणे, थॉमस शेफरही चान्सेलर अँजेला मार्केल यांच्या सीडीयू पक्षाचे नेते होते. (Germany minister Thomas Schaefer suicide)

हेही वाचा : कोरोनामुळे राजघराण्यातील पहिला बळी, स्पेनच्या राजकन्येचा करुण अंत

कोरोनासारख्या साथीच्या आजारामुळे उद्भवलेल्या आर्थिक परिणामाचा सामना करण्यास कंपन्या आणि कामगारांना मदत व्हावी, यासाठी शेफर रात्रंदिवस ​​कार्यरत होते, अशी आठवणही व्होकर बुफियर यांनी सांगितली. या कठीण काळात शेफर यांच्यासारख्या नेत्याची आपल्याला गरज भासेल, अशा भावनाही बुफियर यांनी व्यक्त केल्या. शेफर यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलं आहेत.

जर्मनीत 62 हजार 95 नागरिक कोरोनाबाधित झाल्याची माहिती आहे. कालच्या दिवसात जर्मनीत 108 जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले. तर एकूण कोरोनाबळींचा आकडा 541 वर पोहोचला आहे. (Germany minister Thomas Schaefer suicide)