उत्तर प्रदेशातील विद्यापीठात भूत विद्या शिकवणार, सहा महिन्यांच्या कोर्ससह सर्टिफिकेट

| Updated on: Dec 26, 2019 | 9:39 AM

तुम्ही आता उत्तर प्रदेश येथील बनारस हिंदू विद्यालयातून भूत (Ghost study course Uttar Pradesh) विद्याचा (सायन्स ऑफ पॅरानॉर्मल) अभ्यास करु शकतात.

उत्तर प्रदेशातील विद्यापीठात भूत विद्या शिकवणार, सहा महिन्यांच्या कोर्ससह सर्टिफिकेट
Follow us on

लखनऊ : भूत आणि आत्मा यासारख्या गोष्टी तसेच रहस्यमय गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या इथे अनेकजण उत्सुक असतात. यासाठी तुम्ही आता उत्तर प्रदेश येथील बनारस हिंदू विद्यालयातून भूत (Ghost study course Uttar Pradesh) विद्याचा (सायन्स ऑफ पॅरानॉर्मल) अभ्यास करु शकतात. हा सहा महिन्याचा कोर्सअसून (Ghost study course Uttar Pradesh) सर्टिफिकेटही दिले जाणार आहे.

यामध्ये मानशास्त्राबद्दल शिकवले जाणार आहे. मानसिक रुग्ण, असामान्य गोष्टींमुळे होणारी असामान्य मानसिक अवस्था यावर उपचार कसा करावा, अंगात येणे यासारख्या अनेक गोष्टींवर शिकवले जाणार आहे. या कोर्सची पहिली बॅच जानेवरीमध्ये सुरु होत आहे. हे प्रशिक्षण आयुर्वेद विभागाकडून आयोजित केले जाणार आहे.

भूतामुळे होणारे मानिसक आजार आणि आजारावरील उपचार बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी (बीएएमएस) आणि बॅचलर ऑफ मेडिसिन अँड बॅचलर ऑफ सर्जरी (एमबीबीएस) विद्यार्थ्यांना हे शिकवले जाणार आहे.

“या विषयी डॉक्टरांना शिकवण्यासाठी विद्यापीठात भूत विद्याचा एक विभाग तयार करण्यात आला आहे. जेणे करुन इतरांना शिकवण्यासाठी त्याचा उपयोग होईल. हा कोर्स भूतसंबधी आजार आणि मानसिक आजारांच्या आर्युवेद उपचारासंबधी असेल”, असं आर्युवेद विभागाचे डीन भूषण त्रिपाठी यांनी सांगितले.”

या आर्युवेद शाखेसाठी सहा महिन्यांपूर्वी एका विभागाची स्थापन करण्यात आली आहे. विद्यालयातील सर्व 16 विभागांच्या प्रमुखांच्या बैठकीनंतर या विभागाच्या प्रस्तावाला परवानगी देण्यात आली.