पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीची आत्महत्या

| Updated on: Jul 05, 2019 | 4:48 PM

लातूर: पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या तरुणीने सततच्या अपयशाने आत्महत्या केली. शुभश्री म्हस्के (वय-25) असं आत्महत्या केलेल्या मुलीचं नाव आहे. शुभश्रीने लातूरमधील मुरुड इथं राहत्या घरी गळफास घेऊन आयुष्य संपवलं. शुभश्री पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती. मात्र सतत परीक्षा देऊनही तिला अपयश येत होतं. या अपयशाने खचून जात शुभश्रीने आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. शुभश्री […]

पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीची आत्महत्या
Follow us on

लातूर: पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या तरुणीने सततच्या अपयशाने आत्महत्या केली. शुभश्री म्हस्के (वय-25) असं आत्महत्या केलेल्या मुलीचं नाव आहे. शुभश्रीने लातूरमधील मुरुड इथं राहत्या घरी गळफास घेऊन आयुष्य संपवलं.

शुभश्री पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती. मात्र सतत परीक्षा देऊनही तिला अपयश येत होतं. या अपयशाने खचून जात शुभश्रीने आत्महत्येचा मार्ग स्वीकारला.

शुभश्री मूळची उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील पिंपरी येथील रहिवसी होती. तीन वर्षांपासून ती पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती. मात्र नातेवाईकांचं लग्न असल्याने, ती लातूरमधील मुरुडला आली होती. इथेच तिने काल संध्याकाळी आत्महत्या केली. शुभश्रीच्या आत्महत्येमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सध्या हजारो मुलं स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. त्यामुळे जागा कमी आणि उमेदवारांची संख्या जास्त अशी सर्वत्र स्थिती आहे. त्यामुळे प्रचंड स्पर्धा आहे. मात्र यावर आत्महत्या हा उपाय नाही.