कोरोना व्हायरसचा धसका, चक्क शंकराच्या पिंडीला मास्क

कोरोना व्हायरस चीनसह अनेक देशांसाठी घातक ठरत (God wear mask varanasi temple) आहे. या व्हायरसपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी लोकांना अनेकजण सल्ले देत आहेत.

कोरोना व्हायरसचा धसका, चक्क शंकराच्या पिंडीला मास्क
| Edited By: | Updated on: Mar 11, 2020 | 6:24 PM

लखनऊ (उत्तरप्रदेश) : कोरोना विषाणू चीनसह अनेक देशांसाठी घातक ठरत (God wear mask varanasi temple) आहे. या विषाणूपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी अनेक सल्ले दिले जात आहे. वाराणसीमध्ये देवालाही कोरोना होतो की काय अशी भीती भाविकांना आहे. त्यामुळे लोकांना जागरुक करण्यासाठी शंकराच्या पिंडीला मास्क लावण्याचा गजब प्रकार वाराणसीत (God wear mask varanasi temple) करण्यात आला आहे.

समाजसेवक रवींद्र त्रिवेदी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह वाराणसीच्या प्रल्हाद घाटावर बनलेल्या प्रल्हादेश्वर मंदिरमधील पिंडीला मास्क लावला आहे. मंदिराच्या बाहेरही पोस्टर लावून लोकांना जागरुक केले जात आहे. मंदिरात येणाऱ्या भक्तांनी मूर्तीला स्पर्श करु नये तसेच लांबून पूजा करावी, अशा सूचना दिल्या आहेत.

“कोरोना विषाणू जगभरात पसरत आहे. स्पर्श केल्याने हा विषाणू वाढू शकतो. यासाठी आम्ही लोकांमध्ये जागरुकता आणण्यासाठी देवाला मास्क लावला आहे. यामधून लोकांना चांगला संदेश दिला जात आहे. त्यामुळे लोक एकमेकांना स्पर्श करण्यासाठी सावध राहतील. तसेच अनेक लोक जागरुक राहतील”, असं रवींद्र यांनी सांगितले.

रवींद्र म्हणाले, “कोरोना व्हायरस जगभरात वाढत आहे. हा विषाणू स्पर्श केल्याने वाढू शकतो. त्यामुळे लोकांना जागरुक करण्यासाठी आम्ही देवाला मास्क लावला आहे. याने लोकांमध्ये एक चांगला संदेश जाईल. जेणेकरुन लोक एकमेकांना स्पर्श करण्यापासून सावध राहतील.”

“आम्ही मंदिरातील मूर्ती आणि शिवलिंगला मास्क लावले आहे. लोकांनी मूर्तीला स्पर्श करु नये. त्यामुळे विषाणू अनेक लोकांपर्यंत पोहोचू शकतो”, असंही रवींद्र यांनी सांगितले.

“हिवाळ्यात देवाला चादर, उन्हाळ्यात पंखा, एसीचा वापर केला जातो. अशाप्रकारे जागरुकतेसाठी देवाला मास्क लावण्यात आला आहे. काशी भगवान भोलेच्या नगरीतून सर्वत्र संदेश पोहोचतो”, असं पुजारी मुन्ना तिवारीने सांगितले.