Gold Price: सोने स्वस्त! आज सर्वात मोठा खरेदी योग, वाचा औरंगाबादचे भाव!

| Updated on: Nov 25, 2021 | 5:58 PM

औरंगाबादः सोने खरेदीसाठी अजूनही मुहूर्त पाहण्याची परंपरा भारतात मोठ्या प्रमाणावर पाळली जाते. त्यामुळे आजच्या गुरुपुष्यामृत योगावरही मोठ्या प्रमाणावर सोने खेरदी केली जात आहे. औरंगाबादच्या सराफा (Aurangabad market) बाजारातही आज ग्राहकांची चांगलीच वर्दळ दिसून येत आहे. त्यातच लग्न सराई सुरु असल्यामुळे ग्राहकांनी गुरुवारी सोने खरेदीसाठीचा वेळ खास राखून ठेवल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे काल पासून सोन्याचे […]

Gold Price: सोने स्वस्त! आज सर्वात मोठा खरेदी योग, वाचा औरंगाबादचे भाव!
Follow us on

औरंगाबादः सोने खरेदीसाठी अजूनही मुहूर्त पाहण्याची परंपरा भारतात मोठ्या प्रमाणावर पाळली जाते. त्यामुळे आजच्या गुरुपुष्यामृत योगावरही मोठ्या प्रमाणावर सोने खेरदी केली जात आहे. औरंगाबादच्या सराफा (Aurangabad market) बाजारातही आज ग्राहकांची चांगलीच वर्दळ दिसून येत आहे. त्यातच लग्न सराई सुरु असल्यामुळे ग्राहकांनी गुरुवारी सोने खरेदीसाठीचा वेळ खास राखून ठेवल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे काल पासून सोन्याचे (Gold Price) जवळपास 800 ते 1000 रुपयांनी कमी झाले आहेत.

वाचा औरंगाबादचे भाव

औरंगाबादच्या बाजारात आज 25 नोव्हेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याचे भाव 48,520 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. काल म्हणजेच 24 नोव्हेंबर रोजीदेखील हेच भाव होते. या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याने पन्नास हजार रुपयांची पातळी गाठली होती. मात्र मंगळवार, बुधवारनंतर सोन्याचे भाव पुन्हा कोसळू लागले. नोव्हेंबर महिन्यातील सोन्याचे औरंगाबादमधील सरासरी भाव पाहिले असता ते 49,520 रुपयांच्या आसपास असल्याचे दिसून आले.

चांदीच्या दरात काहीशी वाढ

औरंगाबादच्या सराफा बाजारात चांदीच्या दरात कालपेक्षा आज काहीशे रुपयांची वाढ दिसून आली. काल 24 नोव्हेंबर रोजी चांदीचे भाव 63,940 रुपये प्रति किलो होते. मात्र आज हे भाव 64,070 रुपये प्रति किलोवर पोहोचले. नोव्हेंबर महिन्यातील एकूण सरासरी पाहिली असता, एक किलो शुद्ध चांदीचे भाव या महिन्यात 66,705 च्या आसपास होते.

गुरुपुष्यामृत योगाचे महत्त्व मोठे

पुष्यामृत योग हा गुरुवारी येणे दुर्मिळ मानले जाते. त्यामुळे आजच्या दिवसाला भारतीय परंपरेत विशेष महत्त्व आहे. या दिवशी खरेदी केलेली किंवा मिळवलेली कोणतीही गोष्ट स्थिर राहिते. कारण स्थायी, स्थिर नक्षत्र म्हणून पुष्य नक्षत्राकडे पाहिले जाते. म्हणूनच सोने हा मैल्यवान धातू आपल्याकडे अक्षय रहावा, या इच्छेने तो सदर मुहूर्तावर खेरदी केला जातो. या योगावर खरेदी केलेल्या सोन्यात अधिक भर पडत राहते, असा एक समज आहे आणि काही लोकांचे अनुभव देखील आहेत.

इतर बातम्या-

ठरलं! राज्याचं हिवाळी अधिवेशन 22 ते 28 डिसेंबरला मुंबईतच होणार- सूत्र

Nashik Gold| योगायोगाचे घबाड, सोने दीड अन् चांदी 4 हजारांनी स्वस्त, वर्षातला शेवटचा गुरुपुष्यामृत गोड झाला!