आता मोबाईलच्या किमती महागणार, जीएसटी 12 वरुन 18 टक्क्यांवर

| Updated on: Mar 14, 2020 | 7:09 PM

जीएसटी काऊन्सिलने आज (14 मार्च) मोबाईल फोनवरील जीएसटी वाढवण्याचा (GST increase on mobile phone) निर्णय घेतला आहे.

आता मोबाईलच्या किमती महागणार, जीएसटी 12 वरुन 18 टक्क्यांवर
व्हॉट्सअ‍ॅपने बऱ्याच वेळा या नवीन स्टोरेज मॅनेजमेंट टूलची चाचणी केली आहे. काही बीटा वापरकर्ते आधीपासूनच या सुविधेचा लाभ घेत होते.
Follow us on

मुंबई : जीएसटी काऊन्सिलने आज (14 मार्च) मोबाईल फोनवरील जीएसटी वाढवण्याचा (GST increase on mobile phone) निर्णय घेतला आहे. जीएसटी काऊन्सिलच्या या निर्णयानुसार आता मोबाईल फोनवर 18 टक्के जीएसटी आकारला जाणार आहे. यापूर्वी मोबाईलवर 12 टक्के जीएसटी आकारला (GST increase on mobile phone) जात होता.

मोबाईल फोनवरील जीएसटीमध्ये वाढ केल्यामुळे याचा फटका ग्राहकांना पडणार आहे. तसेच मोबाईलच्या किमतीतही वाढ होणार आहे. मोबाईल फोनच्या काही पार्टवर पहिल्यापासून 18 टक्के जीएसटी लावला जात होता. पण आता सर्व मोबाईलवर जीएसटी वाढवण्यात येणार आहे.

“मोबाईल फोन आणि त्याच्या पार्ट्सवरील जीएसटी 18 टक्के करण्यात आला आहे”, अशी माहिती केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली.

दरम्यान, पहिल्यापासून शक्यता वर्तवली जात होती की, 14 मार्चपासून जीएसटी काऊन्सिलच्या बैठकीत मोबाईल फोनवरील जीएसटीत वाढ केली जाणार आहे. काऊन्सिलनेही आता जीएसटीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.