राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या बाजूनं, चंद्रकांत पाटील राज्यपालांना का भेटले याची कल्पना नाही : गुलाबराव पाटील

| Updated on: Nov 08, 2020 | 6:29 PM

राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या बाजूनं आहे, असं वक्तव्य पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव येथे केले. (Gulabrao Patil Said Govt in favour of Maratha Reservation)

राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या बाजूनं, चंद्रकांत पाटील राज्यपालांना का भेटले याची कल्पना नाही : गुलाबराव पाटील
Gulabrao Patil
Follow us on

जळगाव : अखिल भारतीय मराठी लोककलावंत तमाशा परिषद, अखिल भारतीय मराठी शाहिर परिषद व केशवस्मृती सेवासंस्था समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आज जळगावात खान्देश लोककलावंत विचार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उदघाटन पाणी पुरवठा आणि स्वच्छता  मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर उपस्थितांना संबोधित करताना राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या बाजूनं आहे. मराठा आरक्षणासाठी कोर्टात लढाई सुरु असल्याची माहिती गुलाबराव पाटील यांनी दिली. सध्याच्या काळातील बदलत्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना परखड शब्दांत मत मांडत नाराजी व्यक्त केली. (Gulabrao Patil Said Govt in favour of Maratha Reservation)

मातोश्री परिसरात मराठा आरक्षण प्रश्नी सुरू असलेल्या आंदोलन प्रश्नावर बोलताना जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, आंदोलन करणं हा त्यांचा अधिकार आहे आणि आंदोलनाने प्रश्न सुटतात पण सरकार देखील मराठा आरक्षणाच्या बाजूने आहे, म्हणून होणारी नोकरभरती थांबलेली आहे. कोर्टात लढाई सुरू आहे आणि सरकार देखील प्रयत्नशील असल्याची माहिती गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

“सध्या राजकीय पक्षांमध्ये ठिकाणा राहिलेला नाही. प्रत्येक पक्षात लोक निष्ठा विकायला निघाले आहेत,” असे परखड मत शिवसेनेचे प्रवक्ते तथा राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री यांनी व्यक्त केले आहे.

राज्यपाल विधान परिषदेच्या 12 जागांबाबत निर्णय घेतील

महाविकास आघाडी सरकारनं राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादी राज्यपालांकडे सुपुर्द केली असतानाच, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे राज्यपालांना भेटण्यासाठी गेले होते. मला यातील काही कल्पना नसून हा प्रोसेसचा भाग आहे. यादी राज्यपालांकडे पाठवली आहे, एवढंच मला माहित आहे आणि पुढील निर्णय राज्यपाल घेतील ते त्यांच्या वैयक्तिक कामानिमित्त देखील भेटले असती, असे गुलाबराव पाटील म्हणाले.

दरम्यान, लॉकडाऊन नंतर पहिल्यांदा लोक कलावंतानी एकत्र येऊन विचार परिषदेचे आयोजन जळगाव येथे केले. यावेळी लॉकडाऊन मुळे सर्व लोक कलावंतांवर उपासमारीची वेळ आली असून शासनाने लवकरच सार्वजनिक कार्यक्रम सुरू करावेत, अशी मागणी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे करण्यात आली. तसेच, कोरोनाच्या संकट काळात खान्देशी लोककला व लोक कलावंतांवर मोठा आघात झाला आहे. तमाशा, शाहिरी, गोंधळ, वाघ्या-मुरळी, वही गायन, सोंग, सोंगाड्या पार्टी आधी लोककला प्रकारात काम करणार्‍या व लोक कलेचे जतन व संवर्धन करणार्‍या लोक कलावंतांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. यावर मंथन करण्यासह विविध मागण्यांसाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

संबंधित बातम्या :

बेळगावात मराठी भाषिकांवर अन्याय,भाजप सरकारची सीमाप्रश्न सोडवण्याची मानसिकता नसल्याने निषेध : गुलाबराव पाटील

पंकजा मुंडे शिवसेनेत आल्या पाहीजेत, मग राजकारणात मजा येईल : गुलाबराव पाटील

(Gulabrao Patil Said Govt in favour of Maratha Reservation)