नवी मुंबई महापालिका आयुक्तांची तडका फडकी बदली, अभिजित बांगर नवे आयुक्त

| Updated on: Jun 23, 2020 | 2:25 PM

नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची तडका-फडकी बदली करण्यात आली (IAS Abhijit Bangar) आहे.

नवी मुंबई महापालिका आयुक्तांची तडका फडकी बदली, अभिजित बांगर नवे आयुक्त
Follow us on

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची तडका-फडकी बदली करण्यात आली (IAS Abhijit Bangar) आहे. त्यांच्या जागी आता सनदी अधिकारी अभिजित बांगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अभिजित बांगर हे नवे आयुक्त म्हणून लवकरच पदभार स्वीकारतील (IAS Abhijit Bangar).

नवी मुंबईत कोरोना रुग्णांची वाढती संख्या हे अण्णासाहेब मिसाळ यांच्या बदलीचे कारण तर नाही ना, अशी चर्चा आता सुरु झाली आहे. अण्णासाहेब मिसाळ यांच्या बदलीमुळे महापालिकेत तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

आण्णासाहेब मिसाळ यांच्यासह आणखी दोन सनदी अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. डॉ. विजय राठोड यांची मीरा भाईंदर मनपा आयुक्तपदी तर डॉ. राज ध्यानिधी यांची उल्हासनगर मनपा आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

नवी मुंबईच्या आयुक्तपदी आलेले अभिजित बांगर कोण आहे ?

अभिजीत बांगर 2008 च्या तुकडीचे IAS अधिकारी आहेत. युवा आणि धडाडीचे सनदी अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. सध्या नागपूर विभागाचे अतिरीक्त आयुक्त आहेत. 14 महिने नागपूर महापालिकेचे आयुक्त म्हणून त्यांनी काम केले आहे.

अभिजित बांगर यांनी 14 महिन्याच्या कार्यकाळात नागपूरमधील कचरा आणि पाण्याची समस्या सोडवली, स्वच्छ भारतमध्ये नागपूरचा क्रमांक सुधारला. त्यानंतर त्यांची बदली वस्त्रोद्योग विभागाचे संचालक म्हणून झाली. मात्र त्यांनी पदभार स्विकारला नव्हता. शेवटी नागपूर विभागाचे अतिरिक्त आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती केली होती.

संबंधित बातम्या :

मुंबई महापालिका आयुक्तपदावरून हटवल्यानंतर प्रवीण परदेशींचा सुट्टीचा अर्ज

मुंबई महापालिका आयुक्तपदावरुन प्रवीण परदेशींची उचलबांगडी, इक्बाल चहल नवे आयुक्त